Goa Lokotsav 2026 : लोकोत्सवातून संस्कृतीची देवाण-घेवाण

कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर; लोकोत्सव २०२६ चे थाटात उद्घाटन
Goa Lokotsav 2026
Goa Lokotsav 2026
Published on
Updated on

पणजी : 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या संकल्पनेवर आधारित लोकोत्सव २०२६ ला दरवर्षीप्रमाणे यंदाही गोव्यातील आणि देशातील संस्कृतीची देवाण-घेवाण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आपला भारत देश विविध वेशभूषा, भाषा, खाद्यसंस्कृती आणि परंपरांचे माहेरघर असून त्यांचे प्रतिबिंब यंदाच्या लोकोत्सवाच्या रंगमंचाच्या सजावटीमधून दिसून येते.

लोकोत्सवाच्या माध्यमातून गोमंतकीय संस्कृती जगभरात पोहोचेल, असे प्रतिपादन कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी केले. लोकोत्सव २०२६ उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्यश्री विनायक खेडेकर, संचालक विवेक नाईक, उपसंचालक मिलिंद माटे, राजू गावकर, सदस्य सचिव शंकर गावकर, आनंद कवठणकर, क्रीडा प्राधिकरण संचालक अजय गावडे आदी उपस्थित होते.

मंत्री तवडकर म्हणाले की, यंदाच्या लोकोत्सवात १८ राज्यांतील कलाकारांचे सादरीकरण पाहायला मिळणार आहे. पुढील दहा दिवस चालणाऱ्या या उपक्रमात आपल्या भारताची आणि गोव्याची संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचण्यास मदत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण संस्कृतीची या कास धरणाऱ्या गोमंतकीयांनाही पणजी लोकोत्सवाचा भाग करण्यासाठी कला विभागाने पुढाकार घेऊन पेडण्यापासून कोकणपर्यंतच्या लोकांना इथे येण्यास सहकार्य करावे.

संचालक विवेक नाईक म्हणाले की, २५ वर्षांपूर्वी संस्कृतीशी निगडित असलेल्या उद्योजकांना व्यासपीठ देण्यासाठी सुरू झालेल्या उत्सवाचे रूपांतर संस्कृती आणि लोककलेच्या या भव्य लोकोत्सवात झाले. यंदा लोकोत्सवाचे हे २५ वे वर्ष असून यावर्षी सुरक्षेच्या कारणास्तव स्टॉलची संख्या कमी करण्यात आली आहे. मात्र सर्व ठिकाणी अग्निशामक आणि आपत्ती व्यवस्थापनाची सोय असून आवश्यक बाबींकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. विविधतेतून एकतेचे दर्शन घडवणारा रंगमंच २०२६ च्या लोकोत्सवात उभारलेला रंगमंच आणि त्याची सजावट ही संपूर्णपणे विविधतेतून एकत्रचे दर्शन घडवणारी आहे.

गोव्यातील इतिहासाची साक्ष देणारा शापोरा किल्ला, राष्ट्रीय पक्षी मोर, गेटवे ऑफ इंडिया, चक्र हस्तमुद्रा, गोव्यातील लोकसंस्कृतीतील महत्त्वाचे असलेले घुमट वाद्य, वीणा, आगस्तीन टॉवर, केरळचे लोकनृत्य कथकली, भरतनाट्यम, गोव्यातील माडाची झाडे, कोळी बांधव, राष्ट्रीय फूल कमळ तसेच संदेशाची आदानप्रदान करण्यात मोलाची भूमिका बजावणारे कबूतर अशा विविध गोष्टींमधून राष्ट्रीय एकात्मता दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news