Zuari River Environment | झुआरी नदीकिनारी कथित जमीन घोटाळा लोकायुक्तांच्या रडारवर

Zuari River Environment | खंडपीठाची कुडचडे पालिका, जीसीझेडएमएला नोटीस
River
RiverPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

झुआरी नदीकिनारी सरकारी जमिनीवरील कथित अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकाम, बनावट कागदपत्रांचा वापर आणि प्रशासकीय निष्क्रियतेच्या आरोपांप्रकरणी गोवा लोकायुक्तांनी कुडचडे-काकोडा पालिका व गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (जीसीझेडएमए) नोटीस बजावली आहे.

River
Mamata Banerjee new dream - ममता दीदींचे नवे स्वप्न

कुडचडेमधील रहिवासी सुशांत वस्त यांनी गोवा लोकायुक्त कायदा, २०११ अंतर्गत दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारीनुसार, सर्व्हे क्र. ४६/० परिसरातील सरकारी मालकीच्या जमिनीवर एका खासगी कंपनीने आवश्यक परवानग्या न घेता बांधकाम केल्याचा आरोप आहे.

तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, अधिकृत नोंदींमध्ये फेरफार करून नकल (डुप्लिकेट) किंवा बदल केलेले दस्तऐवज दाखल करण्यात आले. तसेच, नियम टाळण्यासाठी सुधारित आराखडा (स्केच) अधिकृत फाइलमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

River
Goa | पूर्वेतील रोम नव्हे, दक्षिण काशी गोवा

८ मे २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत निवृत्त न्यायमूर्ती संदीप के. शिंदे यांनी तक्रारदाराचे म्हणणे ऐकून कुडचडे-काकोडा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना संबंधित कागदपत्रांसह जबाबदार अधिकारी उपस्थित करण्याचे निर्देश दिले.

या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ जून २०२६ रोजी होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते आदित्य देसाई यांनी झुआरी नदीकिनारी सरकारी नोंदींमध्ये फेरफार आणि पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news