Goa news | प्रभाग सीमांकनानंतर इच्छुक उमेदवार चिंतेत

मुरगाव पालिका निवडणुकीचे वेध; प्रभाग संख्या २५ ऐवजी २१ वर
Goa muncipal Election
Goa ElectionPudhari
Published on
Updated on

वास्को : आगामी मुरगाव पालिका निवडणुकीसाठी पंचवीस ऐवजी एकवीस प्रभागांचे सीमांकन जाहीर करण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांपुढे आपले काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक प्रभागांची सीमा आता वाढल्याने निवडणुकीत मतदारांशी संपर्क साधताना उमेदवारांची बरीच दमछाक होणार आहे, यात शंकाच नाही. तथापि, काहीजणांना पूर्वीप्रमाणे २५ प्रभाग राहतील, अशी आशा अद्याप वाटत आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या संबंधित लोकप्रतिनिधींच्या संपर्कात राहण्याची धडपड चालविली आहे.

मुरगाव पालिकेचे गेल्या निवडणुकीत २५ प्रभाग होते. त्यापैकी ९ मुरगावात, साडेबारा वास्को मतदार संघात तर साडेतीन दाबोळी मतदार संघातील प्रभाग होते. आता सीएसआर अंतर्गत मतदार यादी तयार करण्यात आल्यावर सुमारे १६-१७ हजार मतदारांची नावे गाळण्यात आली आहेत. त्यामुळे मतदार संख्या कमी झाल्याने प्रभागही कमी करण्यात आले आहेत. आता मुरगाव मतदार संघात नऊऐवजी सात, वास्को मतदार संघात साडेबाराऐवजी दहा तर दाबोळी मतदार संघात साडेतीन ऐवजी चार प्रभाग होणार आहेत.

निवडणूक आयुक्तांनी यासंबंधी अधिसूचना काढली आहे. तसेच नवी सीमांकन कसे असतील यासंबंधीची माहिती दिली आहे. त्यासंबंधी काही सूचना, आक्षेप असतील ते नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तथापि, नवीन प्रभाग व त्याचे सीमांकन पाहून बऱ्याच जणांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता प्रभाग कमी होणार आहे. त्यामुळे एका प्रभागाला दुसऱ्या प्रभागातील काही भाग जोडण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागाची सीमा वाढली आहे.

पंचवीस प्रभाग राहतील असे समजून विद्यमान नगरसेवक व नगरसेविकांनी आपले काम आपल्या प्रभागापुरते मर्यादित ठेवले होते. तसेच इच्छुकांनी आपला लक्ष जुन्या प्रभागाच्या सीमापुरते केंद्रित केले होते. परंतु आता प्रभाग एकवीस झाल्याने व प्रभागाची सीमा वाढल्याने त्यांची धावपळ सुरू होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news