Goa Tourism Development | 50 जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळांच्या योजनेत गोवा

Goa Tourism Development | केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत : भव्य कन्व्हेशन सेंटर उभारण्याचा प्रस्ताव
Gajendra Singh Shekhawat Union Minister of Culture and Tourism / केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत
Goa Tourism DevelopmentPudhari News Network
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
देशातील ५० जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे विकसित करण्याच्या राष्ट्रीय उपक्रमात गोव्यातील निवडक पर्यटन स्थळांचा समावेश करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिली.

Gajendra Singh Shekhawat Union Minister of Culture and Tourism / केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

भाजपच्या प्रादेशिक परिषदेत शेखावत यांनी गोव्यातील पर्यटन विकासासंबंधीतील विविध प्रस्तावांची माहिती दिली. गोव्याची पर्यटन क्षमता लक्षात घेऊन राज्यातील महत्त्वाच्या स्थळांचा जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय गोव्यात भव्य कन्व्हेशन सेंटर उभारण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचारधीन असल्याचे शेखावत यांनी स्पष्ट केले. या केंद्रामुळे मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांसह व्यावसायिक गोव्याची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

Gajendra Singh Shekhawat Union Minister of Culture and Tourism / केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत
Foreign Woman Rape Case | परदेशी महिलेवरील बलात्कारप्रकरणी बंगळुरुस्थित खासगी कंपनीच्या सीईओला पणजी महिला पोलिसांकडून अटक

पर्यायी जमीन शोधण्याचा प्रयत्न

जुने गोवे हे ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र असल्याने विकासकामांदरम्यान आढळणाऱ्या पुरातत्त्वीय अवशेषांचे जतन करणे आवश्यक आहे. उत्खननाच्या वेळी ऐतिहासिक वस्तू आढळल्याने संबंधित ठिकाणी पुढील काम थांबवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पासाठी पर्यायी जमीन शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ऐतिहासिक वारशाला कोणतीही हानी न पोहोचवता पर्यटन विकासाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी स्पष्ट केले.
जुने गोवे येथील ऐतिहासिक वारसा स्थळांच्या विकासासाठी प्रस्तावित असलेला 'प्रसाद' योजनेअंतर्गत प्रकल्प सध्या थांबवण्यात आला आहे. प्रकल्पाच्या कामासाठी उत्खनन सुरू असताना काही ऐतिहासिक वस्तू सापडल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.