Worms In Tap Water | पाण्यात आढळलेल्या अळ्यांची मानवाधिकार आयोगाकडून दखल

Worms In Tap Water | साबांखा, आरोग्य खात्याला नोटीस; सुनावणी २३ रोजी
Worms In Tap Water 2026
Worms In Tap Water 2026
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सत्तरी तालुक्यातील झर्मे गावात पिण्याच्या पाण्यात अळींसदृश जीव आढळल्याच्या वृत्ताची गोवा मानवाधिकार आयोगाने (जीएचआरसी) स्वेच्छा दखल घेतली आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आयोगाने सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि आरोग्य खात्याला नोटिसा बजावल्या असून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल २३ जूनपर्यंत मागवला आहे.

Worms In Tap Water 2026
Goa Dengue | गोव्यात पावसाळ्याच्या तोंडावर डेंग्यूविरुद्ध युद्धपातळीवर तयारी! आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना तीव्र

झर्मे गावातील नागरिकांनी नळाद्वारे पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्यात अळ्यांसारखे जीव आढळत असल्याची तक्रार केली होती. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मानवी आरोग्याशी संबंधित हा संवेदनशील विषय असल्याने आयोगाने तातडीने हस्तक्षेप करत पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी, पाण्याचे नमुने तपासणे आणि नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली आहे, याबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news