Goa workers news | स्थानिक कामगारांच्या नोंदणी वाढीस सरकार प्रयत्नशील

रोजगारविनिमय, कौशल्य विकासामुळे २,७७७ नोकरदार खाजगी क्षेत्रात
Workers
Published on
Updated on

पणजी : राज्यातील स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने विविध महत्त्वपूर्ण उपाययोजना राबवल्या आहेत. राज्यातील रोजगार विनिमय नोंदणी ही पूर्णपणे ऐच्छिक असली, तरी १६ फेब्रुवारी पर्यंत नोंदणीकृत उमेदवारांची शैक्षणिक पात्रतेनुसार माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये इलेक्ट्रिशियन, प्लंबर, मेकॅनिक, वेल्डर, पेंटर आदी विविध क्षेत्रातील स्थानिक कामगारांची नोंदणी वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यात २,७७७ उमेदवारांना खाजगी क्षेत्रात नोकरी दिल्याची माहिती कामगार व रोजगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली.

सरकारच्या गोवा ऑनलाईन पोर्टलद्वारे नोकरी शोधणाऱ्यांना मोठी मदत मिळत आहे. कंपन्या जेव्हा त्यांच्या रिक्त जागांची माहिती या पोर्टलवर अपलोड करतात, तेव्हा नोंदणीकृत उमेदवारांना थेट संधी उपलब्ध होते. तसेच, उमेदवारांना त्यांच्या लॉगिनद्वारे खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील उपलब्ध नोकऱ्यांची माहिती पाहता येते आणि थेट अर्ज करता येतो.

स्थानिकांना रोजगारासाठी तयार करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक रोजगार विनिमय अंतर्गत मॉडेल करिअर सेंटर विविध उपक्रम राबवत आहे. करिअर मार्गदर्शन, कौशल्यविकास प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, तसेच उद्योजकता प्रशिक्षण यांचा त्यात समावेश आहे.

या उपक्रमांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, आतापर्यंत १२ रोजगार मेळावे आणि ११० प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आले आहेत. यामधून तब्बल २७७७ उमेदवारांना खाजगी क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्या आहेत. स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार बहुआयामी प्रयत्न करत असल्याचे या माहितीतून स्पष्ट झाले आहे.

खाजगी क्षेत्रासाठी स्वतंत्र रोजगार धोरण

दरम्यान, राज्यातील स्थानिक युवकांना प्राधान्य मिळावे, यासाठी सरकार खाजगी क्षेत्रासाठी स्वतंत्र रोजगार धोरण तयार करण्याच्या दिशेनेही पावले उचलत आहे. यासाठी टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आली असून धोरणाचा मसुदा सध्या विचाराधीन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news