Subhash Faldesai | पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी गोव्यात होणार जल निरीक्षकांची नेमणूक; मंत्री सुभाष फळदेसाईंचा इशारा

पेयजलमंत्री सुभाष फळदेसाई; गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
Subhash Phaldessai |
Subhash Phaldessai: Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पाण्याची चोरी आणि गळती रोखण्यासाठी तसेच पाणीवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी जल निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक इमारतीमधील आणि परिसरातील पाणीवापराची तपासणी केली जाईल. नियमबाह्य किंवा आवाजी पाणीवापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पेयजलमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिला.

Subhash Phaldessai |
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

यंदा राज्यात कमी पाऊस पडला असला, तरी नागरिकांनी पाणीटंचाईची भीती बाळगण्याचे कारण नाही. येत्या मे-जून महिन्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत मिराबग येथील प्रस्तावित जलउत्सा केंद्र पंचवाडी येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पाण्याचा साठा जुलैपर्यंत टिकण्याची अपेक्षा : मंत्री शिरोडकर:

गोव्यातील सुमारे ८० टक्के बंधारे बंद करण्यात आले आहेत. उर्वरित २० टक्के बंधारे शेतकऱ्यांच्या भातकापणी होईपर्यंत सुरू राहतील. त्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही. कच्च्या पाण्याचा पुरवठा मे ते जुलैपर्यंत टिकेल, अशी अपेक्षा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केली. साळावली धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग पुढील दोन दिवसांत थांबण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

Subhash Phaldessai |
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणार:

ग्रामीण आणि शहरी भागातील जुन्या पाणीपुरवठा योजना, विहिरी आणि इतर जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. खाणी व खंदकांतील पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य बनवण्याचे नियोजन आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत हे पाणी नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देनेचा प्रयत्न असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा आवाजी वापर टाळून नागरिकांनी गरजेपुरते पाणी वापरावे, असे आवाहन फळदेसाई यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news