गंभीर आजारांसाठी गोवा सरकारचा मदतीचा हात

Goa News | पॅलिटिव्ह केअर युनिटसाठी अडीच लाखांचे अर्थसहाय्य
Pramod Sawant
पॅलिटिव्ह केअर युनिटसाठी संस्थांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केली. Pudhari News Network
Published on
Updated on
अनिल पाटील

पणजी : अल्झायमर, पार्किन्सन्स, कर्करोग, ब्रेन स्ट्रोक अशा आजारांनी ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी पॅलिटिव्ह केअर युनिट चालवण्यासाठी नोंदणीकृत संस्थांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत अशा संस्थांना प्रतिमहिना अडीच लाख रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. (Goa News)

गोवा सरकार, आरोग्य आणि समाज कल्याण संचालनालयाकडे नोंदणीकृत संस्थांना दीर्घकालीन आणि दुर्मिळ आजारांनी ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पॅलिटिव्ह केअर युनिट चालवण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. अल्झायमर, पार्किन्सन, ब्रेन स्ट्रोक, कर्करोग अशा आजाराने ग्रस्त असणाऱ्या नागरिकांची काळजी आणि रुग्णांना विशेष वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. सध्या अशा दोन योजनांना आर्थिक मदत जाहीर केली असून यात आयएमए फोंडा आणि शांती आवेदन लोटली या संस्थांचा समावेश आहे. (Goa News)

जेव्हा आजार वाढत असतो किंवा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. तेव्हा अशा रुग्णांना डिस्चार्ज घेऊन घरी पाठवण्यात येते, अशा रुग्णांना घरी पुढील उपचार करणे अनेक कुटुंबांना शक्य होत नाही. अशावेळी अशा रुग्णांचे हाल होतात. यासाठी काही केअर सेंटर्स अशा रुग्णांची सेवा करतात. अशा केअर युनिटना राज्य सरकारच्या मार्फत आर्थिक मदत मिळावी. यासाठी संबंधित संस्थांनी प्रयत्न केले होते. यावर राज्य सरकारने निर्णय घेऊन अशा संस्थांना प्रति महिना अडीच लाख रुपये पर्यंतची मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Goa News)

सरकारी किंवा बिगर सरकारी संस्था या योजनेचा लाभ घेऊ शकतात. संस्था राज्य सरकारकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. अशा युनिटमध्ये किमान २० रुग्ण असणे अपेक्षित आहे. संस्था प्रतिष्ठित असावी आणि तिला किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. या मंजूर पैशांमध्ये डॉक्टर, वैद्यकीय सल्लागार, पॅरा वैद्यकीय पथक, वीज, पाणी, टेलिफोन, न्यूज पेपर या खर्चासह औषध खर्च, जेवण आणि राहण्याच्या खर्चाचा समावेश असावा. एकूण खर्चातील २५ टक्के रक्कम संस्थेने उचलावी, असे नमूद केले आहे.

Pramod Sawant
गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news