

पणजी : पुढारी वृत्तसेवा पर्वरी मंत्रालयातात झालेल्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन खात्याने आयोजित केलेल्या १० व्या सक्षम समितीच्या बैठकीत गोवा स्टार्टअप धोरण २०२५ अंतर्गत बीज भांडवल अनुदानासाठी आठ स्टार्टअप्सची निवड करण्यात आली. यात एआय, आरोग्य आणि पर्यटन यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयटी खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी समितीने स्टार्टअप्ससाठी आलेल्या २७ अर्जाचे मूल्यांकन केले. त्यानंतर १६ स्टार्टअप्सना समितीकडे पुन्हा शिफारस करण्यात आली, शेवटी आरोग्य सेवा तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), पर्यटन आणि डिजिटल सुलभता या क्षेत्रातील उपक्रमांची निवड करण्यात आली. प्रत्येक मंजूर स्टार्टअपला सरकार एकवेळ आर्थिक साहाय्य देणार आहे. डॉ. सावंत आणि मंत्री खंवटे यांनी गोवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पाद्री कॉन्सेसावो कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यासारख्या संस्थांमधील विद्यार्थ्यांना यावेळी धनादेश प्रदान केले.
मंत्री खंबटे म्हणाले, गोवा भारताच्या स्टार-टूप लैंडस्केपमध्ये एक गंभीर स्पर्धक म्हणून उदयास येत आहे. सीड कॅपिटल ग्रेट योजनेद्वारे, आम्ही हे सुनिश्चित करत आहोत की संस्थापकांना कल्पनांचे स्केलेबल व्यवसायांमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेला महत्त्वाचा प्रारंभिक पाठिंबा मिळेल. सरकार अशा इको-सिस्टमला प्रतिसाद देईल.
मायक्रो-टास्क मार्केटप्लेस तयार : मंत्री खंवटे मंजूर यादीमध्ये बांधकाम क्षेत्रासाठी व्हर्चुअल रिअॅलिटी आणि एआय आधारित बांधकाम आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देणारी एआय संचालित डिजिटल अॅक्सेसिबिलिटी प्लॅटफॉर्म, इन्क्लुसिअर यांचा समावेश आहे. नागरिकांना दैनंदिन सेवांसाठी विद्यार्थ्यांशी जोडणारे एक मायक्रो-टास्क मार्केटप्लेस तयार केले गेले आहे. गोव्याच्या पर्यटन-आधारित विशेषतः संबंधित जेवण आणि क्रियाकलापांसाठी पर्यटन शोध प्लॅटफॉर्म उपलब्ध करत असल्याचे मंत्री खंवटे यांनी सांगितले