Vijai Sardesai Congress alliance | ... तर सरदेसाई ठरतील डोकेदुखी

Vijai Sardesai Congress alliance | ... तर सरदेसाई ठरतील डोकेदुखी
Goa legislative assembly bill 2026
MLA Vijay Sardesaipudhari photo
Published on
Updated on

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांची काही काँग्रेस नेत्यांकडून मनधरणी सुरू असली तरी विरोधकांची एकजूट करण्याच्या कार्यपद्धतीवर ते नाराज आहेत. त्यांची ही नाराजी खासदार विरिएतो फर्नांडिस यांच्याशी केलेल्या चर्चेमधून समोर आली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांना आमदार विजय सरदेसाई हे काँग्रेसमध्ये आलेले नको आहेत. सरदेसाई काँग्रेसमध्ये आले किंवा गोवा फॉरवर्डशी युती केली तर आलेमाव यांचे महत्त्व कमी होणार याची भीती त्यांना आहे. सरदेसाई भविष्यात मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ठरू शकतात, असे त्यांना वाटते. हेच युरी आलेमाव यांना नको आहे.

बांगला देशींना हलक्यात घेऊ नका...

वागातोर येथे बेकायदा राहणारी आणि कुठल्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय बांगला देशमधून भारतात आलेली युवती फातिमा खातून (वय २९) पोलिसांकडून पकडली गेली. फातिमा ही एकटीच असणार नाही. भारतातील मोठ्या शहरांमध्ये बांगला देशींचे लोंढेच्या लोंढे येत आहेत. त्याला आता ग्रामीण भागही अपवाद नाही. बांगला देशी, रोहिंग्या यांनी गोव्यातील अनेक भागात व्यवसाय उभे केले आहेत. काहीजण मजुरी करताहेत. बांगला देशमधील मुस्लिम समुदायाकडून इतर धर्मियांचा केला जाणारा छळ लपून राहिलेला नाही. त्यामुळे अशा फातिमांकडे पोलिसांनी दुर्लक्ष करू नये. ती कुठल्या मार्गान व कशी आली, तिला कोणी कोणी मदत केली, तिच्यासोबत किंवा आधी व नंतर बांगला देशमधून कोण-कोण आले याची माहिती मिळवून त्या सगळ्यांना पुन्हा त्यांच्या देशात लवकरात लवकर पाठवण्याची व्यवस्था सरकारने करायला हवी. जातीय सलोख्याचा आदर्शवाद भविष्यात धोकादायक ठरू शकतो, असे लोकांचे म्हणणे आहे.

गडकरी यांचा कोकण प्रवास

राज्य सरकारने गणेशोत्सवापूर्वी पर्वरी उड्डाणपुलाचे उद्घाटन करून त्यानंतर त्यावरून गणेशभक्तांना मूर्ती नेता येईल, असे काही महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. पर्वरीतील पुलाचे उद्घाटन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करून ते शब्द खरे केले. यावेळी गडकरी यांनी गोवा आणि कोकणातील कामांची तुलनाही केली. मुंबई-कन्याकुमारी महामार्गावरील गोव्यातील कामे ज्या वेगाने झाली ते पाहता कोकणातील कामे फारच मागे पडलेली आहेत. मुंबई-गोवा रस्त्याचे काम कंत्राटदार बदलले तरीही अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे संबंधित खात्याचा मंत्री म्हणून आपण उद्घाटनास उपस्थित राहणार नसल्याचे ते म्हणाले. संपूर्ण काम पूर्ण होताच मुंबई-गोवा असा रस्त्याने प्रवास करणार आहे. आता मंत्र्यांनी अशा प्रकारची घोषणा करताना कामचुकार ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची केलेली घोषणा पाहता संबंधित काम लवकरच पूर्ण होईल आणि पर्वरीप्रमाणे कोकणातील लोकांचाही प्रवासाचा प्रश्न सुटेल अशी आशा आहे.

आत्मविश्वास असावा तर असा...

माजी मुख्यमंत्री, मडगावचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांना निवडणूक जिंकण्याचा फारच आत्मविश्वास आहे. पत्रकारांनी त्यांना बुधवारी निवडणुकीबाबत विचारले असता आपण निवडणुकीची काळजी कधीच करत नाही. काँग्रेसमध्ये असतानाही केली नाही आणि भाजपमध्ये असतानाही नाही. कारण मडगावकरांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ते आपल्याला निवडून देतीलच. आपली ही नववी निवडणूक असेल. आपण निवडणुकीची जराही काळजी करत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. एरवी निवडणुका म्हटल्यानंतर आमदार, मंत्र्यांच्या पोटामध्ये गोळा येतो. मात्र, दिगंबर कामत यांना चिंता नाही. त्यामुळे आत्मविश्वास असावा तर असा असे म्हणावे लागेल.

काँग्रेस ऐकणार तरी कोणाचे ?

सत्ताधारी पक्षाविरोधातील आघाडी तयार करण्याबरोबरच त्यांच्यासोबत आघाडी आहे ती कशी टिकवून ठेवता येईल यासाठी काँग्रेस नेते प्रयत्न करत आहेत. सरकारवरील नाराज कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश घडवून आणला जात आहे. त्यातच पक्षातील काही नाराज कार्यकर्ते नव्या आघाडीची गरज व्यक्त करत काँग्रेसवर टीका करत आहेत. माजी खजिनदार ऑर्विल रॉड्रिग्ज यांनी तर 'गोवा फर्स्ट'ची हाक दिली आहे. दुसरीकडे गोवा फॉरवर्डसोबतच्या आघाडीबाबतही सध्या संभ्रम असताना प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अमित पाटकर यांची गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांच्याशी जवळीक वाढताना दिसते. खासदार विरिएतो फर्नाडिस यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणाऱ्यांना प्रवेश नाकारण्याची सूचना केली आहे. या सर्व घडामोडींत कोणाचे ऐकावे आणि कोणाला नाराज करावे हेच काँग्रेस नेतृत्वाला कळेनासे झाले आहे.

काँग्रेस ऐकणार तरी कोणाचे ?

सत्ताधारी पक्षाविरोधातील आघाडी तयार करण्याबरोबरच त्यांच्यासोबत आघाडी आहे ती कशी टिकवून ठेवता येईल यासाठी काँग्रेस नेते प्रयत्न करत आहेत. सरकारवरील नाराज कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश घडवून आणला जात आहे. त्यातच पक्षातील काही नाराज कार्यकर्ते नव्या आघाडीची गरज व्यक्त करत काँग्रेसवर टीका करत आहेत. माजी खजिनदार ऑर्विल रॉड्रिग्ज यांनी तर 'गोवा फर्स्ट'ची हाक दिली आहे. दुसरीकडे गोवा फॉरवर्डसोबतच्या आघाडीबाबतही सध्या संभ्रम असताना प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अमित पाटकर यांची गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांच्याशी जवळीक वाढताना दिसते. खासदार विरिएतो फर्नाडिस यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणाऱ्यांना प्रवेश नाकारण्याची सूचना केली आहे. या सर्व घडामोडींत कोणाचे ऐकावे आणि कोणाला नाराज करावे हेच काँग्रेस नेतृत्वाला कळेनासे झाले आहे.

डीजेला शपथ नव्हे आवाहन...

गणेश चतुर्थी सणाची उत्सुकता ही आबालवृद्धांना असते. चतुर्थी काळात काय-काय करायचे याचेही नियोजन केले जाते. फटाके फोडले जातात. विसर्जन मिरवणुकीत तर डीजे लावून एकापेक्षा एक आणि लोकांचे लक्ष वेधून घेतील अशी गाणी वाजवली जातात. याचा त्या परिसरातील रहिवाशांना त्रासही होतो. तसा आनंदही मिळतो. परंतु कोणीही विरोध किंवा सूचना करण्याआधीच मुरगाव प्रशासनाने डीजे ऑपरेटरांसोबत बैठक घेत त्यांना आवाजाची मर्यादा पाळण्याची सूचना केली. तर आमदार दाजी साळकर यांनी सणाच्या काळात त्रास होणार नसल्याचे सांगितले. आता आमदारांनी हमी दिल्यावर त्यांच्या शब्दाला कितीजण मान देतात हे प्रत्यक्ष चतुर्थी काळातच दिसून येईल. जर नियमांचे ठरल्यानुसार पालन झाले तर तो संपूर्ण गोव्यासाठी आदर्श असेल.

थेट फॉरवर्डच्या बालेकिल्ल्यावर हल्ला ?

हा काँग्रेस नेता नेमका कोण आहे, ज्याने पक्षाच्या नेतृत्वाला असा सल्ला दिला की, युतीतील भागीदार पक्ष असलेल्या 'गोवा फॉरवर्ड' चे प्रमुख विजय सरदेसाई यांना पुन्हा चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी त्यांच्याच बालेकिल्ल्यात, म्हणजेच फोर्डामध्ये काँग्रेसचा उमेदवार जाहीर करणे हा एक मार्ग असू शकतो? राजकीय निरीक्षक या वृत्ताची सत्यता पडताळण्याच्या कामात गुंतले असतानाच, या घडामोडींचे पडसाद 'गाँयकार घर' म्हणजेच पक्षाच्या मुख्यालयातही उमटताना दिसत आहेत. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, पक्षाच्या नेत्यांनी या घडामोडीकडे गांभीर्याने पाहिले आहे. आता पुढे काय होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

आरोलकर अजूनही तळ्यात-मळ्यात

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर मंत्री सुदिन ढवळीकर यांनी ती चर्चा फेटाळत ते मगोचेच नेते आहेत, असा दावा केला. आरोलकर यांनीही त्याला हसत हसत दुजोरा देत अजून तरी ता आहे, असे स्पष्ट केले. पुढील काळात काही नाही, असेही ते बोलून गेले. गेल्या साडेचार वर्षांत नेत्यांच्या सहवासापेक्षा भाजपच्याच सहवासात मंत्र्यांना हाताशी धरून आपल्या मतदारसंघातील मे करून घेत होते. मात्र त्यांना अडथळा आहे तो विष्ठ नेते दयानंद सोपटे यांचा. त्यामुळे मगो की द्विधावस्थेत जीत आरोलकर आहेत.

नाटेकर यांचे स्वप्न साकार होणार का ?

म्हापशाचे व्यावसायिक व काँग्रेसचे निष्ठावंत नेते गुरुदास नाटेकर अनेक वर्षांपासून आमदार होण्याची स्वप्ने पाहत आहेत. अनेकवेळा त्यांनी निवडणूकही लढवली. मात्र विजय मिळाला नाही. २०२२ मध्ये ते दावेदार असताना काँग्रेसन अन्य व्यक्तीला उमेदवारी दिली. येत्या निवडणुकीत आपणाला पुन्हा उमेदवारी मिळाव यासाठी गुरुदास नाटेकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. पाहूया त्यांना उमेदवारी मिळते का.

साखळीत मुख्यमंत्री घेताहेत रिस्क

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात मराठीप्रेमींची संख्या मोठी आहे. त्यांनी निवडणुकीला अवघे चार महिने असताना शुक्रवारी मराठीला राजभाषेचा दर्जा देता येणार नसल्याचे विधान केले आहे. त्यामुळे मराठीप्रेमी नाराज झाले आहेत. यात साखळीतील मराठीप्रेमींचाही समावेश आहे. २०२२ च्या निवडणुकीत डॉ. सावंत हे फक्त ६६६ मतांनी जिंकले होते. मराठीप्रेमींची साखळीत पाच हजारांच्या आसपास मते आहेत. जी पूर्वीपासून डॉ. सावंत यांनाच मिळत आहेत. मात्र, त्यांनी सरळ सरळ मराठी राजभाषा होणार नसल्याचे सांगितल्याने या पाच हजार मतातील अवधी हजारभर मते जरी विरोधात गेली, तरी ती मुख्यमंत्र्यांसाठी रिस्क आहे, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर चालू आहे.

पहिल्या प्रवासासाठी तीन तास प्रतीक्षा

पर्वरीत उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाचे दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्घाटन केले होते. त्याचवेळी शुक्रवारी संध्याकाळी ४ वा. पासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती. त्यामुळे पुलाचे उद्घाटन होईल तेव्हा त्यावरून जाणारा पहिला प्रवासी मीच असावे यासाठी लोकांनी पणजीच्या बाजूने रांग लावली होती. एक व्यापारी तर दुपारी तीन वाजताच येऊन वाहतूक सुरू होईपर्यंत तेथे थांबले होते. काही तांत्रिक कारणांमुळे वाहने सोडण्याचा कार्यक्रम दोन तास लांबणीवर गेला. संध्याकाळी साडेसहा वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी वाहनांना झेंडा दाखवून पूल वाहतुकीसाठी खुला केला. पण त्यापूर्वी रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना त्यांनी गुलाबाचे फुल देऊन शुभेच्छा दिल्या. त्या प्रवाशांनाही पहिला प्रवास सार्थकी लागल्याचा आनंद झाला असेल. कारण यानिमित्ताने का होईना मंत्र्यांच्या हस्ते शुभेच्छा स्वीकारण्याची संधी तर मिळाली, हेही नसे थोडके.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news