गोवा फॉरवर्डचा विद्यापीठ कुलगुरूंना घेराव

भरती प्रक्रियेवरून गोमंतकीय उमेदवारांबाबत पक्षपात केल्याचा गोवा फॉरवर्डचा आरोप
Goa Forward surrounds the University Vice-Chancellor
पणजी : विद्यापीठ कुलगुरूंना घेराव घालताना गोवा फॉरवर्डचे पदाधिकारी. Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : गोवा विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ अर्थ ओशन अँड अटमॉस्फेरिक सायन्स’ विभागातील भरती प्रक्रियेत गोमंतकीयांवर अन्याय झाल्याचा आरोप करत सदर प्रक्रिया रद्द करण्यासाठी गोवा फॉरवर्डतर्फे कुलगुरूंना आज गुरुवारी घेराव घालण्यात आला.

सदर विभागातील सहायक प्राध्यापक पदासाठी गेल्यावर्षी झालेल्या मुलाखती रद्द करून पदांची पुन्हा जाहिरात का करण्यात आली, असा सवाल सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी केला. नव्या जाहिरातीनुसार गोव्यात 15 वर्षांच्या वास्तव्याचा पुरावा आणि कोकणी भाषेची अट शिथिल करून परप्रांतीयांना नोकरी देण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे विद्यापीठ गोव्यातील उमेदवारांबाबत पक्षपाती असल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाने केला. यावेळी उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दीपक कलंगुटकर, सरचिटणीस संतोषकुमार सावंत, पर्यावरण विभागाचे संयोजक विकास भगत आणि कार्यकारी सदस्य कादर शाह, फ्रेडी त्रावासो तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

मुलाखती स्थगित ठेवणार

दरम्यान, विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन यांनी, या विभागातील दोन पदांसाठी होणार्‍या मुलाखती स्थगित ठेवण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांनी सोमवारी गोवा फॉरवर्डच्या शिष्टमंडळाला भेटण्याचेही मान्य केले असून, या पदासाठी पात्र असलेल्या गोमंतकीय उमेदवारांची यादी सादर करणार असल्याचे सांगितले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news