Goa Forward Party | गोवा फॉरवर्ड पार्टी घेणार दसऱ्यादिवशी महत्त्वाची राजकीय घोषणा; गोवा फर्स्ट आघाडी सोडण्याची शक्यता

Goa Forward Party | गोवा फर्स्ट आघाडीला रामराम करण्याची शक्यता
Goa Forward Party
Goa Forward Party
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा फॉरवर्ड पार्टी आपल्या आगामी राजकीय वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दसऱ्यादिवशी घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे त्यांनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला केलेल्या गोवा फर्स्ट आघाडीला रामराम ठोकणार असल्याची चर्चा रंगत आहे.

Goa Forward Party
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन पक्षाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी पक्षाकडून सुरू असलेल्या हालचालींचा विचार करून गोवा फॉरवर्ड पक्ष आपली भूमिका निश्चित करणार आहे. या कार्यकरिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर पक्षाचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या पुढील राजकीय वाटचालीची घोषणा विजयादशमीच्या दिवशी प्रसारमाध्यमांसमोर केली जाईल, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या पक्षाकडून कोणती राजकीय भूमिका जाहीर केली जाते, याकडे गोव्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

येत्या दोन दिवसांत राज्य कार्यकारिणीची बैठक घेտण्यात येणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती, इतर विरोधी पक्षांशी संभाव्य सहकार्य तसेच भाजपविरोधी राजकीय आघाडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितीले की, राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती आणि विविध पक्षांकडून सुरू असलेल्या हालचालींचा विचार करून गोवा फॉरवर्ड पक्ष आपली भूमिका निश्चित करणार आहे.

Goa Forward Party
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

विरोधीखांनी काँग्रेसऐवजी भाजपला लक्ष्य करावे:
भाजपला विरोध करणाऱ्या पक्षांनी परस्परस्पर टीका करण्याऐवजी सत्ताधारी भाजपवर लक्ष केंद्रित करावे व विरोधकांना एकजुटीचे आवाहन करावे, असे गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आम आदमी पक्षावर अप्रत्यक्षपणे निशाणा करताना केले.

'आप'ने आपला राजकीय लढा काँग्रेसविरोधात न करता भाजपच्या दिशेने वळवावा, असे सरदेसाई यांनी मत व्यक्त केले. गोव्याच्या मतदारसंघावर थेट परिणाम करणाऱ्या प्रश्नांवर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news