Goa FDA | गोव्यात विनापरवाना चिकन विक्रीवर एफडीएचा दणका; हणजूणमधील दोन आस्थापने बंद

Goa FDA | विनापरवाना तसेच नियमांचे उल्लंघन करून हणजूण किनारी भागात घाऊक कोंबडी चिकन विक्रेत्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी धडक मोहीम सुरू केली आहे.
Raw Chicken Storage
Raw Chicken Storage
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

विनापरवाना तसेच नियमांचे उल्लंघन करून हणजूण किनारी भागात घाऊक कोंबडी चिकन विक्रेत्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. हणजूण येथील शबहात खान यांच्या 'मीट सेन्सेशन' नावाच्या दोन आस्थापनांचा व्यवसाय बंद करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी पावले उचलण्यात आली असल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Raw Chicken Storage
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

संबंधित आस्थापनांना सुरुवातीला नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती आणि सुधारणा नोटिसा देण्यात आल्या आहेत. 'मीट सेन्सेशन' या आस्थापनाकडे कोणताही परवाना नसताना बेकायदेशीर ते सुरू होते. नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्यास उल्लंघनाच्या स्वरूपानुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे. किरकोळ उल्लंघनांसाठी दंड, तर गंभीर स्वरूपाच्या उल्लंघनांसाठी मोठा दंड, प्रकरणांचे कंपाउंडिंग, परवाना निलंबित करणे तसेच आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Raw Chicken Storage
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

नियमांचे पालन न करणाऱ्या ठिकाणांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. संबंधित आस्थापनांना जागा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अशा ठिकाणांवर पुन्हा व्यवसाय सुरू होऊ नये यासाठी स्थानिक पोलिसांनाही माहिती व नजर ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी संबंधित ठिकाणांवर लक्ष ठेवावे आणि प्रशासनाच्या देखरेख व्यवस्थेचा भाग म्हणून त्यावर नजर ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.