गोवा बनतेय सट्टेबाजीचे केंद्र

आयपीएलवर कोट्यवधींचा सट्टा
goa-emerging-as-betting-hub
गोवा बनतेय सट्टेबाजीचे केंद्र Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : जगाच्या नकाशावर आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलेले गोवा आता आयपीएलवर चालणार्‍या सट्टेबाजीमुळे (बेटिंग) चर्चेत आले आहे. केवळ 9 दिवसांत उत्तर गोव्यात पोलिस आणि क्राइम ब्रँचने 9 छापे टाकले. या छाप्यात त्यांनी तब्बल 54 जणांना अटक केली तर 51 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे गोव्याची ओळख सट्टेबाजीचे केंद्र होण्याची भीती व्यक्त होत आहे.

क्राइम ब्रँचने 4 ते 9 एप्रिल या काळात चार छापे टाकले आणि एकूण 44 जणांना अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप व अन्य साहित्य असा 42 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर पर्वरी पोलिसांनी 4 व 10 एप्रिल रोजी छापा टाकून अनुक्रमे 2 व 3 व्यक्तींना अटक करून 80 हजार व 2 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पणजी पोलिसांनी 11 एप्रिल रोजी 4 जणांना अटक करून त्यांच्याकडून 4 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर 12 एप्रिल रोजी साळगाव पोलिसांनी 3 जणांना अटक करून 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या तीन दिवसांत पोलिसांनी 10 जणांना अटक केली तर 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पणजी ही गोव्याची राजधानी आहे. याच राजधानीत एका नावाजलेल्या तारांकीत हॉटेलात हा सट्टेबाजीचा अड्डा चालत होता. भाड्याने खोली घ्यायची, घर घ्यायचे आणि त्यातून सगळा व्यवहार चालवायचा अशी सट्टेबाजीचा अड्डा चालवणार्‍यांची मोडस ऑपरेंडी आहे. जवळपास अर्धा कोटी रुपयांचे साहित्य सट्टेबाज वापरत होते. त्यावरून त्यांची दररोजच्या सामन्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असावी हे सरळ आहे.

पोलिसांसमोर आव्हान...

पोलिसांच्या छाप्यात पकडली गेलेली माणसे ही ‘मोहरे’ असावेत आणि त्यांचा ‘आका’ कुणी वेगळाच असावा अशी शंका घ्यायला वाव आहे. शिवाय पोलिसांनी केलेली ही कारवाई म्हणजे केवळ हिमनगाचे टोक असावे. राज्यातील वेगवेगळ्या भागांत, वेगवेगळ्या राहत्या घरांमध्ये, अनेक हॉटेल्समध्ये हे अड्डे सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे अड्डे शोधणे आता पोलिसांसमोर आव्हान आहे.

बेटिंगप्रकरणी तिघांना अटक 1 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त

पणजी : पर्वरी, पणजीनंतर आता साळगाव पोलिसांनी आयपीएल बेटिंगचा पर्दाफाश केला. पोलिसांची सलग तीन दिवसांतील ही तिसरी कारवाई आहे. एका व्हिलामध्ये सुरू असलेल्या या बेटिंग प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आली आहे. कारवाईवेळी 1 मोबाईल फोन आणि लॅपटॉपसह सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी ही कारवाई शनिवारी पहाटे केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सर्वेश भंडारी यांनी तक्रार दिली.

मोहित राजेंद्र छाबलानी (वय 26 ,रा. कुबेरनगर, अहमदाबाद, गुजरात) इमान फैयाज आलम जफर (वय 22, रा. औरंगाबाद नबीनगर, बिहार) व नितीनकुमार लक्ष्मणदास वालेचा (वय 38 ,नरोडा, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान मोबाईल फोनवर/ऑनलाईन बेटिंग स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. साळगाव पोलिस निरीक्षक आणि उपअधीक्षक विश्वेश कर्पे व पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरीक्षक अक्षय फातर्पेकर तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news