Goa Elephant News : खाऊचे आमिष दाखवत ओंकारला सोडले महाराष्ट्राच्या हद्दीत

ओंकार पहिल्यांदाच शेर्ले परिसरात
Goa Elephant News : खाऊचे आमिष दाखवत ओंकारला सोडले महाराष्ट्राच्या हद्दीत
Published on: 
Updated on: 

पणजी : महाराष्ट्र सीमेवरून गोवा सीमेवरील गावांत सातत्याने ये जा करणाऱ्या ओंकार हत्तीला खाऊचे आमिष दाखवत वन कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राच्या हद्दीत सोडले.सिंधुदुर्गातही ओंकारला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी हाच फंडा वापरला जातो. गोवा वनविभागानेही सिंधुदुर्ग वनविभागाच्या पावलावर पाऊल टाकत तोच फंडा वापरला.

गेल्या अनेक महिन्यांपासून ओंकार सिंधुदुर्गातील मानवी वस्तीत राहतो. त्याला गूळ, केळी, भेडले माडाची पाने व अन्य फळे,पाने देऊन या गावातून त्या गावात वनकर्मचारी आणि ग्रामस्थ नेत असतात.पाळीव हत्तीप्रमाणे तो सगळ्यांच्या मागून जातो. त्यामुळे त्याला स्थलांतरित करणे कठीण नसते. सूचनेप्रमाणे तो वागतो. याच तंत्राचा फायदा गोव्यातील वन कर्मचाऱ्यांनी घेतला.

त्यांनी पारंपरिक गोंगाटयुक्त मोहिमांऐवजी राष्ट्रीय महामार्ग ६६ वर शांतपणे आमिष धोरणाचा वापर करून ओंकारला महाराष्ट्राकडे यशस्वीपणे परत पाठविले. यापूर्वी, ओंकार तिलारी कालवामार्गे राज्याच्या सीमा ओलांडत असे; तथापि, वन विभागाच्या पथकांनी ओंकारला सीमेपलीकडे सहजपणे नेण्यासाठी थेट महामार्गावरूनच नेण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याला वेगवेगळ्या फळांचे आमिष दाखविण्यात आले.

यामुळे हत्ती - मानव संघर्ष कमी होण्यास मदत झाली. फळांच्या आमिषाने त्याला स्थलांतरित करण्याच्या पद्धतीला तो गोव्यातही चांगला प्रतिसाद देत आहे, ओंकारच्या बाबतीत ही रणनीती यशस्वी ठरली आहे. असे एका वरिष्ठ वन अधिकाऱ्याने सांगितले.

ओंकार पहिल्यांदाच शेर्ले परिसरात

ओंकार गोव्यातून कासमध्ये गेला होता. कास , मडुरे, शेर्ले, आरोसबाग, पत्रादेवी या मार्गाने तो गेला. शेर्ले (सावंतवाडी) व पत्रादेवी (गोवा) या ठिकाणी थांबून तो पुन्हा शेर्ले सीमेवरील कासमध्ये पोचला. सध्या तो शेर्ले खालचीवाडीमध्ये असून दोन दिवस तो शेर्ले कापईवाडी, पानोसेवाडी, देऊळवाडी परिसरात होता. कापईवाडीत तो मुक्तपणे नदीत डुंबत होता. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news