Goa Cyber Crime | ई-चलनाच्या बनावट लिंकवर क्लिक करणं पडलं महागात! गोव्यात 12.69 लाखांची फसवणूक

Goa Cyber Crime | या प्रकरणात पोलिसांनी ५ लाख ९ हजार ४८३ रुपये सुरक्षित ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.
Mumbai Cyber Crime
Mumbai Cyber Crimepudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

ई-चलन जारी झाल्याचा बनावट संदेश पाठवून मोबाईलमध्ये घातक एपीके फाइल डाउनलोड करण्यास भाग पाडत १२ लाख ६९ हजार ४४६ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर क्राइम पोलिसांनी महबूब के. (२१) आणि सागर कुमार आर. (२२) या दोघांना बंगळूरतून अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ५ लाख ९ हजार ४८३ रुपये सुरक्षित ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.

Mumbai Cyber Crime
IFFI Goa | समुद्रकिनारा, चित्रपट आणि कलाप्रेम! इफ्फीच्या रंगात रंगली गोव्याची राजधानी पणजी

या प्रकरणातील तक्रारदाराला त्याच्या वाहनावर ई-चलन जारी झाल्याचा संदेश प्राप्त झाला होता. संदेशातील लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये एक एपीके फाइल डाउनलोड झाली. त्यानंतर मोबाईलमधून अनधिकृत आर्थिक व्यवहार करण्यात आले आणि तक्रारदाराचे १२.६९ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले. सायबर क्राइम पोलिसांनी आर्थिक व्यवहारांच्या तपासातून या फसवणुकीशी संबंधित धागेदोरे शोधून काढले.

तपासादरम्यान बंगळूरतील दोन संशयितांची ओळख पटली. पोलिस उपनिरीक्षक नवीन नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २५ नोव्हेंबर रोजी चिक्काबनावारा, बंगळूर येथे कारवाई करून महबूब के. (२१) आणि सागर कुमार आर. (२२) यांना अटक केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) सह कलम ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-डी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

५,०९,४८३.२७ रक्कम सुरक्षित

या प्रकरणाशी संबंधित ५,०९,४८३.२७ रक्कम सुरक्षित करण्यात आली आहे. योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही रक्कम तक्रारदाराला परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अटक केलेल्या दोन्ही संशयितांना गोव्यात आणून मेरशी येथील न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या फसवणुकीचा संपूर्ण आवाका निश्चित करण्यासाठी तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असल्याची माहिती सायबर क्राईम कक्षाचे पोलिस अधीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.

पोलिसांकडून आवाहन

नागरिकांनी अनोळखी किंवा अचानक आलेल्या ई-चलन संदेशांमधील लिंकवर क्लिक करू नये. अविश्वसनीय स्रोतांकडून एपीके फाइल डाउनलोड करू नये, तसेच चलनाची माहिती अधिकृत माध्यमातूनच तपासावी, असे आवाहन गोवा पोलिसांनी केले आहे.

Mumbai Cyber Crime
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

कॅनडा व्हिसाच्या नावाखाली ९.६८ लाखांची फसवणूक.

कॅनडात उच्च शिक्षणासाठी मुलीला स्टुडंट व्हिसा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ९ लाख ६८ हजार ४७० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेल्या संशयिताला पर्वरी पोलिसांनी मंगळूर येथून बी. पी. माणिकांता (३७, मंगळूर, कर्नाटक) याला अटक केली. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. आल्त - पर्वरी येथील महिलेने दिलेल्या तक्रारीवरून १० फेब्रुवारी २०२५ रोजी पर्वरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी संशयिताची माहिती मिळवली होती.

मात्र फरारी झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी बंगळूर आणि मंगळूर येथे पथके पाठवली होती. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलीला कॅनडात शिक्षणासाठी स्टुडंट व्हिसा मिळवून देण्याचे आश्वासन संशयिताने दिले होते. त्यासाठी आरोपीने विविध यूपीआय आणि एनईएफटी व्यवहारांद्वारे कुटुंबीय तसेच परिचितांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ९,६८,४७० रुपये जमा करण्यास सांगितले. मात्र, पैसे घेतल्यानंतर आश्वासनाप्रमाणे व्हिसा मिळवून दिला नाही तसेच रक्कमही परत केली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.