Goa Folk Dances at IFFI|गोव्याच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन, लोकनृत्यांनी इफ्फीत भरले रंग

गोव्याच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन, लोकनृत्यांनी इफ्फीत भरले रंग, पारंपरिक कला
Goa Folk Dances at IFFI
पणजी : इफ्फीनिमित्त पारंपरिक कला सादर करताना कलाकार.
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि चित्रपटसृष्टीचा उत्साह यांचा अनोखा संगम घडवून आणत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पणजी येथील गोवा मनोरंजन संस्थेच्या परिसरात इफ्फी २०२६ चित्ररथ मिरवणुकीचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.

'सिनेमाचा आनंद साजरा करणे' या संकल्पनेवर आधारित ही मिरवणूक ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांस्कृतिक सोहळ्याचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आली होती. महोत्सवात रंग आणि सांस्कृतिक चैतन्य भरणारी ही चित्ररथ मिरवणूक कला अकादमी येथे समाप्त झाली.

५५ व्या इफ्फीमध्ये सुरू झालेला आणि ५६ व्या पर्वात विस्तारलेला हा उपक्रम पुढे नेत, यंदाच्या मिरवणुकीत कार्निव्हल आणि शिमगोत्सवाच्या परंपरेतून प्रेरणा घेऊन गोव्यातील कलाकार आणि सांस्कृतिक गटांनी आपली कला सादर केली. या सोहळ्यात आकाशकंदील स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.

Goa Folk Dances at IFFI
IFFI The kerala story 2|लव्ह जिहाद, आंधळे प्रेम अन् सत्य परिस्थितीचे विदारक चित्रण : 'द केरला स्टोरी २'

या उद्घाटन समारंभाला ईएसजीच्या उपाध्यक्षा आमदार डिलायला लोबो, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, तसेच इतर मान्यवर आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Goa Folk Dances at IFFI
IFFI The kerala story 2|लव्ह जिहाद, आंधळे प्रेम अन् सत्य परिस्थितीचे विदारक चित्रण : 'द केरला स्टोरी २'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.