Goa News | म्हापशात पाच दुकाने फोडली

रोख रकमेसह दुकानातील मालावर डल्ला; सुरक्षा ऐरणीवर
Shop Burglary
Shop BurglaryPudhari
Published on
Updated on

म्हापसा : म्हापसा बाजारपेठेतील पाच दुकाने शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी फोडली. दुकानांचे शटर तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी रोख रक्कम तसेच मालही चोरून नेला. या घटनेमुळे येथील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तसेच सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी म्हापसा बाजारपेठेतील पाच दुकानांचे ताळे तोडून आत प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने डेकोरेशन आणि डिस्पोजेबल वस्तूंची दुकाने तसेच कपड्यांच्या दुकानांचा समावेश आहे. एका आस्थापनात चोरट्यांनी गल्ल्यामधील रोख रक्कम आणि वस्तू मिळून लाखभर रुपयांचा मुद्देमाल चोरला, तर इतर चार दुकानांत चोरट्यांनी प्रवेश केला; मात्र तेथून काही चोरून नेले नाही. ज्या ठिकाणी ही चोरी झाली, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. मात्र, म्हापसा पोलिस आता मार्केटमधील इतर भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.

याप्रकरणी दुकानदारांनी म्हापसा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. म्हापसा पोलिस या प्रकरणाचा तपास करीत असून संशयितांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी शोध सुरू केला आहे. दरम्यान, एकूण किती रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

पोलिस बूथ ठरला नाममात्रच

वर्षभरापूर्वी बाजारपेठेत सीसीटीव्ही लावण्यात यावे, अशी सूचना केली होती. तसेच येथील व्यापाऱ्यांनी पोलिस निरीक्षण बूथ उभा केला होता. २४ तास पोलिस तैनात ठेवण्याची सूचना केली होती. असे असताना चोरीचे धाडस करणे म्हणजे पोलिसांना एक प्रकारे आव्हानच असल्याचे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news