Goa news | निष्पक्ष चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Goa news | निष्पक्ष चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Published on
Updated on

मडगाव : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी केली जावी, असे आदेश दिल्याची माहिती माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी दिली. त्यानुसार गुन्हा अन्वेषण विभागाने नुकतेच सुशांत नाईक याच्या घराची झडती घेतली आहे. कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल हे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने केरळ दौऱ्यावर होते. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना हे कृत्य आपल्या बंधूंनी केले असते तरीही त्याला आम्ही धिक्कारले असते, अशीच भूमिका स्पष्ट केल्याचे तेंडुलकर म्हणाले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पक्षाचे सदस्यत्व पाच वर्षांसाठी असते. त्यानंतर त्याने सदस्यत्वाचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे, अशी माहिती त्यांनी दिली. गटाध्यक्ष मनोज नाईक यांनी सांगितले, नगरसेवक सुशांत नाईक यांचे पुत्र सोहम नाईक यांचा सहभाग असलेल्या त्या कथित सेक्स स्कॅंडलचा निषेध केला आहे. हे प्रकरण सुरुवातीला कुडचडे पोलीस हाताळत होते; पण आता हा विषय वाढत चालल्यामुळे क्राईम ब्रँचकडून हे प्रकरण हाताळले जात आहे. या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे सुरू आहे. कोणीही त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये असे ते म्हणाले.

अशी आहे राजकीय पार्श्वभूमी

नगरसेवक सुशांत नाईक याची राजकीय पार्श्वभूमी अशी की पहिल्या वेळेला नगरसेवक म्हणून निवडून येताच ते आमदार नीलेश काब्राल यांच्या गटात आले होते. त्यानंतर त्यांनी विरोधी गटाचे नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांच्याशी हात मिळवणी केली. हल्ली ते भाजपच्या अन्य एका नेत्यासोबत दिसून येत होते. दै. पुढारीतून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या मुलाच्या लैंगिक शोषणाच्या वृत्ताला विरोध करण्यासाठी भाजपच्या इतर वरिष्ठ नगरसेवकांसह ते कुडचडे पोलीस स्थानकात हजर झाले होते. नगरसेवकाशी भाजपने आता संबंध नाकारल्यामुळे त्याची बरीच पंचायत झाली आहे.

भाजपशी नाव जोडू नका

तेंडुलकर यांनी सांगितले की, सोहम नाईक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्याचे वडील नगरसेवक सुशांत नाईक यांचे भाजपशी नाव जोडले जात आहे. मात्र, त्यांचा भाजपशी कसलाही संबंध नाही. आपण त्यांचे प्राथमिक सदस्यत्व तपासले आहे. १०० रुपये शुल्क भरून पक्षाचे सदस्यत्व स्वीकारावे लागते. तेही त्यांनी स्वीकारलेले नाही. ते भाजपचे सदस्यही नाहीत. त्यामुळे पक्षाशी त्यांचे नाव जोडले जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news