Goa Crime : मैत्रीचा गैरफायदा घेऊन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक

संशयिताला अटक करून गुन्हा दाखल
Minor girl sexual assault |
Minor girl sexual assault |Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी साळगाव पोलिसांनी संशयिताविरुद्ध बाल हक्क कायदा व पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास साळगाव पोलिस स्थानकाच्या उपनिरीक्षक सनिषा नाईक करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. त्यानंतर त्याने या मैत्रीचा गैरफायदा घेत तिला एका ठिकाणी घेऊन गेला. तिने प्रतिकार केला तरी त्याने तिचे लैंगिक शोषण केले. ही घटना साळगाव येथील भागात १ मे २०२६ रोजी घडली होती. तिने ही माहिती काही दिवसांनी आपल्या वडिलांना सांगितली असता १६ मे २०२६ रोजी पीडितेच्या पालकांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीच्या आधारे संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याच दिवशी संशयिताला पोलिसांना ताब्यात घेऊन या प्रकरणाची चौकशी केली. संशयिताला अटक करून त्याला पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news