Goa Crime : चार वर्षांच्या बालिकेला मेणबत्तीने चटके! बाणावलीतील संतापजनक प्रकार!

संशयितताला अटक; चार दिवसांची पोलिस कोठडी
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

मडगाव : बाणावली येथे चार वर्षांच्या बालिकेला पेटत्या मेणबत्तीने चटके देऊन तिचा छळ केल्याच्या आरोपाखाली कोलवा पोलिसांनी हजरत अली मेहबूबसाब कलकेरी (२७, मूळ कारवार-कर्नाटक, सध्या बाणावली) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालिकेची आई रेश्मा कडपी नोकरीनिमित्त कुवेतला गेल्याने तिने आपल्या चार आणि आठ वर्षांच्या मुलींना दवर्ली येथील नातेवाईकांकडे ठेवले होते. १० ऑक्टोबर रोजी संशयिताच्या सांगण्यावरून दोन्ही मुलींना बाणावली येथील त्याच्या घरी नेण्यात आले.

१ नोव्हेंबर रोजी मुलींना परत आणल्यानंतर चार वर्षांच्या बालिकेच्या अंगावर भाजल्याच्या गंभीर जखमा दिसून आल्या. मोठ्या बहिणीकडे चौकशी केली असता, जेवताना लहान बहिणीकडून शौच झाल्याने घर अस्वच्छ झाल्याच्या रागातून संशयिताने दोघींना मारहाण केल्याचे समोर आले. तसेच लहान बालिकेच्या गुप्तांगासह शरीराच्या अन्य भागांवर पेटत्या मेणबत्तीने चटके दिल्याचा आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.