Digital Arrest Scam : ‘डिजिटल अरेस्ट’च्या भीतीने गोव्यातील ज्येष्ठाला ४२.६० लाखांचा गंडा

नांदेड येथील तेजस नरहरेला गोवा सायबर पोलिसांकडून अटक
Digital Arrest Scam : ‘डिजिटल अरेस्ट’च्या भीतीने गोव्यातील ज्येष्ठाला ४२.६० लाखांचा गंडा
Published on
Updated on

पणजी : काणकोण तालुक्यातील एका ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची दिल्ली दूरसंचार विभाग आणि मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत तब्बल ४२ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गोवा सायबर पोलिसांनी महाराष्ट्रातील नांदेड येथून तेजस नरहरे (वय २०) याला अटक केली आहे.

त्याच्या बँक खात्यात फसवणुकीच्या रकमेतील दहा लाख रुपये जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. तक्रारदाराला दिल्ली येथील दूरसंचार विभागाचे आणि मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून अज्ञात व्यक्तींनी वेगवेगळ्या पाच व्हॉटस्‌ॲप क्रमांकांवरून कॉल केले. सायबर विभागाने अज्ञात व्हॉटस्‌ॲप मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान फसवणुकीच्या रकमेतील १० लाख रुपये नांदेड येथील एका बँक खात्यात जमा झाल्याचे उघड झाले. तसेच त्या व्यक्तीने त्यातील ९ लाख ५० हजार रुपये धनादेशाद्धारे, तर ५० हजार रुपये एटीएम मशिनमधून काढल्याचे उघड झाले.

पोलिस अधीक्षक राजू राऊत देसाई आणि उपअधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखालील एक पथक नांदेडला रवाना करण्यात आले. या पथकाने नांदेड येथून स्थानिक भाग्यनगर पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने तेजस नरहरे या युवकाच्या मुसक्या आवळल्या त्याला २१ तारखेला अटक करून गोव्यात आणण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news