गोवा : सनातन धर्माचा वाद राजकीय फायद्यासाठी; राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई

गोवा : सनातन धर्माचा वाद राजकीय फायद्यासाठी; राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई

पणजी, पुढारी वृत्तसेवा : सनातन धर्माविषयी उदयनिधी स्टॅलीन यांनी केलेले विधान हे निरर्थक आहे. सनातन धर्माचा वाद हा केवळ राजकीय फायद्यासाठी निर्माण केला जात आहे, असे गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले. राजभवनमध्ये रक्त चंदन उद्यानाच्या उद्घाटनानंतर राज्यपाल पिलई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते.

श्रीधरन पिल्लई म्हणाले, धर्म या शब्दाला इंग्रजी भाषेत तंतोतंत बसणारा असा योग्य शब्द नाही. तो नेहमी धार्मिक गोष्टींशी जोडला जातो. मात्र, त्याचा मूळ अर्थ त्याही पलीकडे जाणारा आहे. महात्मा गांधी यांच्या बाजूने अनेक राष्ट्रीय नेते नेहमी धर्माच्या बाजूने उभे राहिले. सनातन म्हणजे सर्वव्यापी किंवा विश्व व्यापणारा आणि ती आपली सांस्कृतिक परंपरा आहे. त्याचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. अशा प्रकारचे नको असलेले वाद हे दक्षिण भारतात मुद्दामहून राजकीय स्वार्थासाठी उकरून काढले जातात. जेव्हा देशाचा विचार येतो, तेव्हा राष्ट्र प्रथम या तत्वाला महत्व दिले पाहिजे. राजकारण आणि धर्म हे त्याच्या नंतर येतात, असे राज्यपाल म्हणाले.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news