Goa Assembly Election | 'गोवा फर्स्ट' आघाडीचे भवितव्य जनतेच्या हाती! काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांचे मोठे विधान

Goa Assembly Election | माणिकराव ठाकरे : विरोधकांनी भाजपविरोधात एकत्र यावे ही जनतेची इच्छा
Manikrao Kokate
Manikrao KokatePudhari News Network
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांनी भाजपविरोधात एकत्र यावे, अशी जनतेची इच्छा आहे. त्यानुसार काँग्रेसचे दरवाजे सर्व समविचारी पक्षांसाठी खुले आहेत. मात्र, ‘गोवा फर्स्ट’ आघाडीचे गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्ष काँग्रेससोबत येण्यास उत्सुक नसतील, तर त्याबाबतचा निर्णय जनताच घेईल, असे काँग्रेसचे राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Manikrao Kokate
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

बैठकीत ‘गोंय राखण यात्रे’च्या तयारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भाजपविरोधात मजबूत आघाडी उभी करणे ही जनतेची अपेक्षा आहे. गोवा फॉरवर्ड आणि आप यांना काँग्रेससोबत यायचे असेल, तर त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत. काही शंका असल्यास त्यांनी पुढे येऊन स्पष्ट मत मांडावे, असेही काँग्रेस नेत्यांनी सांगितले.
पणजी येथे काँग्रेस कार्यालयात शनिवारी कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बैठकीला राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार ॲड. कार्लोस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा, कार्यकारी अध्यक्ष सुनील कवठणकर, एम. के. शेख, खजिनदार दत्ता नायक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, निमंत्रण देऊनही माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व खासदार विरिएतो फर्नांडिस बैठकीला गैरहजर राहिले.

पाटकरांच्या अनुपस्थितीसंदर्भात ठाकरे म्हणाले की, माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पाटकर यांना प्रत्येक समितीच्या बैठकीत आमंत्रित केले जाते आणि त्यांचे नाव समित्यांमध्ये समाविष्ट केले जाते. पाटकर यांनी बैठकीला उपस्थित राहणे, सूचना देणे आणि त्यांचे विचार मांडणे अपेक्षित आहे. आम्ही त्यांना सभांमध्ये आदराने बोलावतो; बैठकीला उपस्थित राहायचे की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे.

आलेमाव म्हणाले, भाजपचा पराभव करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे आणि लक्ष विचलित करणाऱ्या इतर गोष्टींवर भाष्य करण्याची आमची अजिबात इच्छा नाही. किमान समान कार्यक्रमानुसार आघाडी काम करणार आहे.

Manikrao Kokate
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

पाटकर-विरिएतोंची बैठकांकडे पाठ (चौकट)

काँग्रेसच्या समित्यांमध्ये समावेश करूनही माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, त्यांच्यासोबत दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरिएतो फर्नांडिस यांनीही गाभा समितीच्या आजच्या बैठकीला दांडी मारली. यावरून अजूनही पाटकर आणि विरिएतो यांची मनधरणी करण्यात स्थानिक नेतृत्वाला अपयश आल्याचे स्पष्ट होत आहे.

काँग्रेस कोअर कमिटी बैठकीचा तपशील (तक्ता)

घटक सविस्तर माहिती बैठकीचे ठिकाण काँग्रेस कार्यालय, पणजी (गोवा) प्रमुख उपस्थिती माणिकराव ठाकरे, गिरीश चोडणकर, युरी आलेमाव, ॲड. कार्लोस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा, सुनील कवठणकर इ. प्रमुख गैरहजेरी माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व खासदार विरिएतो फर्नांडिस महत्त्वाचे विषय'गोंय राखण यात्रा' तयारी, भाजपविरोधी आघाडी, गोवा फॉरवर्ड व 'आप'सोबत युतीबाबत भूमिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news