Colvale Central Jail | कोलवाळ जेलमध्ये पुन्हा राडा! कैद्यांची हाणामारी; एक कैदी गंभीर जखमी

Colvale Central Jail | कैदी गंभीर; म्हापसा इस्पितळात दाखल
Goa Colvale prison
Goa Colvale prison
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत विकास भगत हा कैदी गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी म्हापसा इस्पितळात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, कारागृह परिसरात दोन कैद्यांच्या गटांमध्ये अचानक वाद निर्माण झाला. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

Goa Colvale prison
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

या मारामारीत विकास भगत याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर कारागृह प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. कोलवाळ कारागृहातील हाणामारीच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत.

Goa Colvale prison
Panaji shopkeepers fire safety demand|पणजी मार्केटमधील १०९ दुकानांना आगीचा धोका

सप्टेंबर २०२६ मध्ये एका कैद्याने तीन सहकैद्यांवर हल्ला केल्याची नोंद झाली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी अदखलपात्र (बिगर-दखलपात्र) गुन्हा नोंदवला होता. तसेच मे २०२६ मध्ये कारागृहातील उच्च-सुरक्षा ब्लॉकमध्ये झालेल्या संघर्षात एका कैद्याच्या डोक्याला आणि नाकाला दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.