Goa News | ...तर तंत्रज्ञान क्षेत्रात गोवा अधिक सक्षम

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : मंत्रालयात विज्ञान मंथनच्या लोगोचे अनावरण
Goa News | ...तर तंत्रज्ञान क्षेत्रात गोवा अधिक सक्षम
Published on
Updated on

पणजी : विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला तर भविष्यात नवोन्मेष, संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गोवा अधिक सक्षम बनेल. विज्ञान मंथन हा उपक्रम त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. हा उपक्रम राज्यातील इतर शाळांपर्यंतही विस्तारण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पर्वरी येथील मंत्रालयात 'विज्ञान मंथन'च्या लोगोचे अनावरण केले. त्यावेळी ते बोलत होते. हा उपक्रम शाळा, कुटुंबे आणि समुदायाला वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी जोडणारे एक नाविन्यपूर्ण शिक्षण मॉडेल असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

विज्ञान मंथन उपक्रम तीन प्रमुख स्तंभांवर आधारित आहे. 'विज्ञान सेतू' अंतर्गत शाळा आणि समाज यांच्यातील दरी कमी करून वैज्ञानिक उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले जातील. 'विज्ञान खिडकी'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवे वैज्ञानिक प्रयोग, कल्पना आणि संशोधनाची माहिती सुलभ स्वरूपात दिली जाणार आहे, असेही ते म्हणाले. या लोगोची रचना सरकारी हायस्कूल मेरशी व चिंबल येथील सरकारी हायस्कूलतर्फे विशाल सिग्रापुरकर यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आला आहे.

शिक्षणाला मिळेल नवी दिशा : मुख्यमंत्री

विज्ञान मंथन हा उपक्रम त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. हा उपक्रम राज्यातील इतर शाळांपर्यंतही विस्तारण्याचा मानस असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे गोव्यातील शालेय शिक्षणाला नवी दिशा मिळेल, केवळ अभ्यासक्रमापुरते विज्ञान न ठेवता दैनंदिन जीवनाशी त्याचा संबंध जोडणे, प्रश्न विचारण्याची सवय लावणे आणि प्रयोगशीलता वाढवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news