
नाताळाचा महिना हा गोव्यातील सर्वात आकर्षक काळ मानला जातो
नाताळ सणाच्या निमित्ताने पणजीसह राज्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये मागील काही दिवसांपासून साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
आकाशकंदील, मेणबत्त्या, सांताक्लॉज, आईसमॅन, येशू ख्रिस्त, गोठा बनवण्याचे साहित्य, सजावटीचे आणि विद्युत रोषणाईच्या माळा असे विविध सकाळचे साहित्य खरेदी करण्यासाठी अबालवृद्ध अजूनही गर्दी करत आहेत.
या काळात ठिकठिकाणी राज्य सरकार आणि विविध संघटनांकडून गोठा बनवण्याच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामुळे त्या साहित्याला विशेष मागणी बाजारपेठांमध्ये दिसून येते.
अवघा एकच दिवस शिल्लक राहिल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
राज्यातील चर्च आणि चॅपेल हे या कालावधीतील आकर्षणाचे केंद्रबिंदू असून त्यांचीही सुंदर सजावट करण्यात आली आहे.
या दिवसात गोमंतकीय गोड पदार्थांना बाजारात विशेष मागणी असते. यामध्ये दोदोल, बेबिंका या पारंपरिक खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते.
याशिवाय नातेवाईकांना भेटवस्तू म्हणून देण्यासाठी विविध गिफ्ट हॅंपरला देखील विशेष मागणी आहे. .
२५ डिसेंबरच्या साधारण महिनाभर आधीपासून घरांची साफसफाई आणि सजावट सुरू होते.
जागोजागी, रस्त्यांवर आणि घरांच्या अंगणात लावलेले तारे (आकाशकंदील) आणि दिव्यांमुळे या महिन्याला एक जादुई अनुभव येतो