Goa Voters List | गोव्यात 97 पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून गायब! मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांचे चौकशीचे आदेश

Goa Voters List | सीईओ संजय गोयल : कारणे, प्रक्रिया, नोंदी तपासणार
SIR voter list
SIR voter listpudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

विशेष सघन पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेनंतर पात्र असूनही गोवा राज्याच्या मतदार यादीतून ९७ मतदारांची नावे वगळण्यात आल्याच्या प्रकरणाची नव्याने तपासणी केली जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) संजय गोयल यांनी दिली.
मतदार यादीच्या पुनरावलोकन प्रक्रियेदरम्यान पात्र मतदारांची नावे वगळली गेल्याची बाब समोर आली आहे.

SIR voter list
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यामागील कारणे, प्रक्रिया आणि संबंधित नोंदी तपासल्या जाणार आहेत. पात्र मतदारांची नावे कोणत्या आधारावर वगळण्यात आली, त्यासाठी कोणती पडताळणी करण्यात आली आणि या प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या काय, याचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

गोयल यांनी सांगितले की, ही जुनी बाब असल्याने त्यावेळी प्रक्रिया करणारे अधिकारी आता बदलले आहेत. तरीसुद्धा या प्रकाराची नव्याने चौकशी करण्यात येईल. त्यामुळे संबंधित जुन्या नोंदी आणि कागदपत्रांची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

SIR voter list
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

मतदार यादीतील नाव वगळले जाणे हा मतदानाच्या अधिकाराशी संबंधित महत्त्वाचा विषय असल्याने, पात्र नागरिकांचे नाव कोणत्या परिस्थितीत यादीतून वगळले गेले याची पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे एसआयआर प्रक्रियेदरम्यान झालेल्या मतदार नोंदणी आणि वगळण्याच्या प्रक्रियेवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे. चौकशीअंती या ९७ मतदारांच्या नावांबाबत नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news