.jpg?rect=0%2C3%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C3%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Calangute shack owner fined 50000
पणजी : कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरील प्लॅनेट गोवा रेस्टॉरंट अँड रॉक येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात पर्यटन खात्याने रॉक मालकावर ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारचा घटना पुन्हा घडणार नाही, याबाबत रॉक मालकाकडून हमीपत्रही घेण्यात आले आहे. मात्र, हंगाम संपेपर्यंत रॉक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पर्यटन संचालक केदार नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉक चालकाविरुद्धची सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून परवानाधारकाला ५० हजारांचा दंड लावण्यात आला आहे, असे नाईक यांनी स्पष्ट केले.
पर्यटन विभागाने २५ मार्चलाच रॉकचा परवाना निलंबित केला होता. मात्र, सुनावणीनंतर दंडात्मक कारवाई करत रॉकला उर्वरित पर्यटन हंगामासाठी पुन्हा सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हे प्रकरण २५ मार्च २०२६ रोजी घडले होते. कळंगुटमधील संबंधित रॉकमध्ये बंगळुरूहून आलेल्या पर्यटकांचा गट आणि रॉक कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रॉक कर्मचारी पर्यटकांशी हाणामारी करताना दिसले होते.
पोलिस माहितीनुसार, समुद्रकिनाऱ्यावरील बेड रिकामी करण्यास सांगितल्यावर वादाला सुरुवात झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रॉक कर्मचाऱ्यांनी लोखंडी रॉड व बीच छत्रीच्या दांड्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. दरम्यान, रॉकचे परवानाधारक फ्रान्सिस्को रोझारिओ यांनी पर्यटकांच्या आरोपांचे खंडन करत, पर्यटकांनीच वाद उकरून काढल्याचा दावा केला होता. संबंधित कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.