Goa Crime News | मंजुनाथ हरिकांत खूनप्रकरणी नागपूरमधून दोघांना अटक

Goa Crime News | तांत्रिक पाळत ठेवून आवळल्या मुसक्या
Goa Crime News
मंजुनाथ हरिकांत खूनप्रकरणी नागपूरमधून दोघांना अटक
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

बोट मालक मंजुनाथ हरिकांत यांच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात आगशी पोलिसांना यश प्रकरणात पोलिसांनी नागपूर येथून दोन संशयित कामगारांना अटक केली असून; त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. दुर्योधन देवसाई मांझी (३०, मूळ रहिवासी झारखंड, सध्या वास्को) व लालदेव नंदकुमार मांझी (३०, झारखंड) अशी संशयितांची नावे आहेत. मृत मंजुनाथ आले आहे.

Goa Crime News
Goa Crime : मंजुनाथ हरिकांत खूनप्रकरणी नागपूरमधून दोघांना अटक

या हरिकांत रविवारी हरिकांत यांचा खून झाल्याचे रविवारी उघडकीस आले होते. काही मच्छीमारांना समुद्रात मृतदेह दिसून आला होता. मृतदेह मंजुनाथ हरिकांत यांचा असल्याचे उघडकीस येताच एकच खळबळ माजली होती.

मंजुनाथ आपल्या मच्छीमारी बोटीवरील कामगारांसहीत बोट घेऊन मासेमारीसाठी गेले होते. यावेळी कामगारांनी त्यांचा खून करून मृतदेह समुद्रात टाकून नंतर बोट किनाऱ्यावर आणून पलायन केल्याचे पुढे आले आहे. तपासादरम्यान पोलिसांना एका संशयिताचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यावर तांत्रिक पाळत ठेवण्यात आली. कॉल मॉनिटरिंग सेलमार्फत मिळालेल्या सेल आयडी विश्लेषणातून संशयितांचा मागोवा घेण्यात आला.

Goa Crime News
Goa Crime : मंजुनाथ हरिकांत खूनप्रकरणी नागपूरमधून दोघांना अटक

तसेच वास्को फिशिंग जेटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांची ओळख पटवण्यात आली. तपासात संशयित रेल्वेने प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले. संशयितांची छायाचित्रे व माहिती रेल्वे पोलिसांना पाठवण्यात आली.

त्यानुसार नागपूर रेल्वे स्थानकावर दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान, दोन्ही संशयितांना आगशी पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून त्यांना मडगाव येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अनंत गावकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news