Goa NEP Textbooks | गोवा बोर्ड-एससीईआरटी तयार करणार 9 वी ते 12 वीची नवी पुस्तके

Goa NEP Textbooks | राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) अंमलबजावणीनंतर प्रथमच इयत्ता ९ वी ते १२ वीसाठी मराठी आणि कोंकणी विषयांची नवीन पाठ्यपुस्तके गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांच्या संयुक्त समितीद्वारे तयार करण्यात येणार आहेत.
NEP New Textbooks
NEP New TextbooksPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) अंमलबजावणीनंतर प्रथमच इयत्ता ९ वी ते १२ वीसाठी मराठी आणि कोंकणी विषयांची नवीन पाठ्यपुस्तके गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांच्या संयुक्त समितीद्वारे तयार करण्यात येणार आहेत.

NEP New Textbooks
Ramanujan Death Date : चौथीच्या पुस्तकात रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकीची

यापूर्वी या वर्गाच्या पाठ्यपुस्तकांची जबाबदारी गोवा बोर्डाच्या विषय अभ्यास मंडळांकडे होती. मात्र, एनईपीच्या नव्या शैक्षणिक चौकटीमुळे पाठ्यपुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेत हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

एससीईआरटीच्या संचालिका मेघना शेटगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतची एनईपीनुसार नवीन पाठ्यपुस्तके तयार करून विद्यार्थ्यांच्या वापरात आणण्यात आली असली, तरी हे काम एकूण पाठ्यपुस्तक निर्मितीपैकी केवळ ४० टक्के आहे.

NEP New Textbooks
Goa Marathi Textbook Controversy | सध्याची पाठ्यपुस्तके मागे घेतली जाणार नाहीत

या प्रक्रियेत गोमंतकीय लेखकांचे मोठ्या प्रमाणावर दर्जेदार साहित्य उपलब्ध झाल्याचे निदर्शनास आले असून, त्याचा इयत्ता ९ वी ते १२ वीच्या नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्यात येणार आहे.

गोवा बोर्डाचे विषय अभ्यास मंडळ संयुक्त समितीचा भाग असेल, तर एससीईआरटीची भूमिका राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि एनईपीनुसार प्रत्येक इयत्तेसाठी निश्चित करण्यात आलेल्या कौशल्यांशी सुसंगत, वयोगटाला अनुरूप आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम आशय तयार करण्याची असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news