Hadfale Nightclub Fire Case | मृतांच्या नातेवाईकांना 15 लाखांची भरपाई देण्यास लुथरा बंधू तयार

Hadfale Nightclub Fire Case | गोवा खंडपीठाला माहिती : हडफडे बर्च अग्निकांड प्रकरण
Goa Nightclub Fire
Hadfale Nightclub Fire CasePudhari
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये ६ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या २५ जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ लाख रुपये सानुग्रह भरपाई (एक्स ग्रासिया) देण्याची तयारी क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा बंधूंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर दर्शवली आहे.

Goa Nightclub Fire
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

सध्या कोलवाळ सुधारगृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या लुथरा बंधूंनी ही रक्कम भरण्यासाठी चार ते सहा महिन्यांचा कालावधी आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगितले. ही रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याची तयारी असल्याचे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले.

या प्रकरणावरील पुढील सुनावणी १२ ऑक्टोबर रोजी होणार असून, त्यावेळी पीडित कुटुंबीयांकडून भरपाईच्या प्रस्तावाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठासमोर स्वेच्छा जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान लुथरा बंधूंच्या वतीने ही माहिती दिली.

न्यायालयाने भरपाईची ऑफर नोंदीत घेतली; मात्र केवळ ही ऑफर दिल्याने संबंधित पक्ष आपल्या कायदेशीर जबाबदाऱ्यांपासून मुक्त होणार नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, पुढील सुनावणी १२ ऑक्टोबर रोजी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news