

डिचोली : पुढारी वृत्तसेवा
डिचोली पोलिस स्टेशन हद्दीतील शिरगाव येथील मधला वाडा भागात गोळीबार, जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे.
डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपेंद्र चंद्रा गावकर (वय ६६, रा. मधलावाडा, शिरगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित आरोपी म्हणून प्रज्योत ऊर्फ शिरीष लक्ष्मण गावकर आणि गिरीश लक्ष्मण गावकर, दोघेही रा., शिरगाव यांची नावे नमूद केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, दि. ५ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ८.२९ च्या सुमारास संशयि तांनी तक्रारदार व त्यांच्या कुटुंबावि रोधात फोन करून शिवीगाळ केली तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रारदार घराजवळ पोहोच ल्यावर प्रज्योत ऊर्फ शिरीष गावकर हा व्हरांड्यात बंदूक व जिवंत काडतुसे घेऊन उभा होता. त्याने तक्रारदाराच्या दिशेने बंदूक रोखून गोळीबार केला.
मात्र, तक्रारदाराने प्रसंगावधान राखून तेथून पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला. यानंतर संशयित घरात घुसला आणि घराच्या परिसरात पुन्हा गोळीबार करून तेथील रहिवाशांमध्ये दहशत निर्माण केली. तक्रारदाराच्या पत्नी-वरही बंदूक रोखून तिला मारण्याची धमकी दिली.
त्यामुळे त्यांनी घराच्या मागील दरवाजातून पळ काढून स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर संशयिताने तक्रार दाराचे चुलत भाऊ नागेश गावकर यांच्या घरातही बेकायदेशीररीत्या प्रवेश केला. त्यावेळी आरोपींकडे बंदूक असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळाने आरोपी तेथून पळून गेले.