Beach
Beach Pudhari Photo

Goa Beach Rescue 2026 | समुद्रस्नान नियम भंग करणाऱ्यांत विदेशीही

Goa Beach Rescue 2026 | दर आठवड्याला २ परदेशी पर्यटकांची केली जाते सुटका
Published on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर आल्यानंतर जीवरक्षकांची नजर चुकवून धोकादायक जागी समुद्रस्नानास जाऊन नियमभंग करणाऱ्यात विदेशी नागरिकांचाही सहभाग वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वर्षभरात दर आठवड्याला किमान २ परदेशी पर्यटकांची बुडण्यापासून सुटका केली जाते.

Beach
Goa Fire News | गोव्यात 24 तासांत तीन ठिकाणी 'अग्नितांडव'; डिचोली, मोप आणि माशेलमध्ये लाखोंचे नुकसान

यावर्षी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर आणि दूधसागर धबधब्यावर ९८ विदेशी पर्यटकांना बुडण्यापासून वाचवण्यात आले आहे. २०२५ या वर्षात देशी व विदेशी पर्यटकांना वाचवण्याच्या घटनांचा विचार करता उत्तर गोव्यात कळंगुट १०३, बागा ६८, सिकेरी ६१ आणि कांदोळी ५८ घटना घडल्या, तर दक्षिण गोव्यात कोलवा ५५, पालोळे ५०, मोबोर ३८ आणि आगोंदा येथे ३५ समुद्रकिनाऱ्याशी संबंधित घटना घडल्या.

२०२५ मध्ये ५४८ जणांना बुडण्यापासून वाचवले, ज्यात ४५० भारतीय पर्यटक आणि गोव्याचे लोक आणि ९८ परदेशी लोकांचा समावेश होता. परदेशी पर्यटकात सर्वाधिक म्हणजे रशियन (५६), त्यानंतर यूके देशांची संख्या (१३) होती.

१२ जणांना कुत्र्यांचा चावा

२०२५ मध्ये राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांच्या चाव्याच्या १२ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. त्यांच्यावर स्थानिक इस्पितळात उपचार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news