Goa BDO Controversy | गोव्यातील कथित बीडीओची सिंधुदुर्गात दादागिरी

महसूल कर्मचार्‍यांची तक्रार, शासकीय कामात अडथळा,धमकीप्रकरणी गुन्हा दाखल
Goa BDO controversy
तळेखोल : इमारतीवरून शासकीय कर्मचारी आणि फार्महाऊस मालक यांच्यात वाद झाला. Pudhari Photo
Published on
Updated on

पणजी : गोवा सीमेवरील तळेखोल येथे अनधिकृत बिनशेती बांधकामाची मोजमापे घेण्यासाठी गेलेल्या ग्राम तलाठी आणि त्यांच्या सहकार्‍यास डांबून ठेवत जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बीआर फार्महाऊसचे मालक भरत सुरेश महाले आणि त्याचा कामगार (गवस) यांच्याविरोधात दोडामार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भरत महाले हा आपण गोव्यात बीडीओ असल्याचे सांगून दादागिरी करत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

याबाबत पोलिस आणि महसूल विभागाकडून मिळालेली माहितीनुसार, मंगळवार, दि.02 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1.30 ते 3 वाजेच्या दरम्यान गाव तळेखोल, सर्व्हे नं. 58/1 मधील बीआर फार्महाऊस, दोडामार्ग येथे तक्रारदार सुयोग सुनील चौगुले (तलाठी, तळेखोल) हे त्यांचे सहकारी लीलाचंद गणपत जाधव (तलाठी, आयी गाव) यांच्यासह तळेखोल येथील बीआर फार्महाऊसमधील अनधिकृत बिनशेती बांधकामाची तपासणी व मोजमाप करण्यासाठी गेले होते.

त्यावेळी फार्महाऊसवर उपस्थित असलेल्या गवस नावाच्या कामगाराकरवी तलाठी सुयोग चौगुले यांनी फार्महाऊसचे मालक भरत सुरेश महाले यांच्याशी संपर्क साधला. महाले यांनी फोनवर शासकीय कर्मचार्‍यांना अरेरावीची भाषा वापरून माझ्या मालमत्तेचे कोणतेही मोजमाप घ्यावयाचे नाही व घेतल्यास तुम्हांला गंभीर परिणाम भोगावे लागतील” अशी धमकी दिली.

त्यानंतर तलाठी व त्यांच्या सहकार्‍याने मोजमाप सुरू करताच, महाले यांनी पुन्हा कामगार गवस याला त्याचा फोन स्पीकरवर ठेवून फार्महाऊसचे मुख्य गेट आतून कुलूप लावून बंद करण्यास सांगितले. त्यानुसार गवस याने दोन्ही महसूल कर्मचार्‍यांना फार्महाऊसमध्ये गेट बंद करून डांबून ठेवले.

शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी थोड्या वेळानंतर भरत महाले स्वतः गाडी घेऊन घटनास्थळी आला. त्याला महसूल कर्मचार्‍यांनी शासकीय ओळखपत्रे दाखवल्यानंतरही महाले याने तलाठी चौगुले यांना शिवीगाळ केली.

कथित बीडीओची तहसीलदारांनाही अरेरावी

महसूल कर्मचार्‍यांनी घडलेली घटना तत्काळ दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांना कळवली.तहसीलदार ताबडतोब महसूल नायब तहसीलदार व इतर कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, कथित बीडीओ भरत महाले यांनी तहसीलदार यांनाही अरेरावीची भाषा वापरल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Goa BDO controversy
Goa : राज्यात देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी

दोडामार्ग तहसीलदार यांच्या सूचनेनुसार तलाठी सुयोग चौगुले यांनी बुधवार, दि .03 डिसेंबर रोजी दोडामार्ग पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली . पोलिसांनी भरत महाले आणि त्याचा कामगार गवस यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, डांबून ठेवणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे, अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

Goa BDO controversy
Goa Fest | गोवा फेस्तमधील अनोखी परंपरा; नवस फेडण्यासाठी मेणाच्या अवयवांची जोरदार मागणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news