Goa News : गेटचे बांधकाम; आसगावात तणाव

स्थानिकांचा विरोध; कंत्राटदाराकडून पोलिस संरक्षणात काम
Goa News
गेटचे बांधकाम; आसगावात तणाव
Published on
Updated on

म्हापसा : स्थानिक मासेमार बांधवांना विश्वासात न घेता तसेच त्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता आसगाव, बादे येथील लहान मासेमारी धक्क्यावर गेट घालण्याचा मत्स्योद्योग खात्याचा प्रयत्नामुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला त्यामुळे कंत्राटदाराला पोलिसांना पाचारण करावे लागले.

या रॅम्पवरून या भागातील बहुतेक मासेमार बांधव होडीद्वारे मासेमारी करीत असतात. बुधवारी सकाळी या ठिकाणी गेट भरण्याचा प्रकार सुरू झाल्यानंतर काही स्थानिक या ठिकाणी एकवटले व त्यांनी त्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला; परंतु कंत्राटदाराने पोलिस बंदोबस्तात काम सुरूच ठेवले.या मासेमारी बांधवांनी दिलेल्या माहितीनुसार जर या ठिकाणी एकालाच जाण्या-येण्या एवढी छोटी गेट घातली तर होडी दुरुस्त करण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी ती गैरसोयीची ठरेल. दुरुस्त करावयाची असेल तर धक्क्यापर्यंत गाडी न्यावी लागेल, तसे न करता आल्यास व्यवसायावर त्याचा परिणाम होऊ शकतो. याकरिता ही गेट घालण्यास आमचा विरोध असून गेट घालण्यापूर्वी आम्हाला कळवणे किंवा विश्वासात घेणे गरजेचे होते, असे त्यांनी सांगितले.

असा घडला होता प्रकार

ही घटना मुंगुल येथील मडगाव-कोलवा रस्त्यावर घडली होती. मुखवटा घातलेल्या हल्लेखोरांनी एका कारवर हल्ला केला. रफिक ताशन (वय 24) आणि युवकेश सिंग बडैला (20) या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. बडैला याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी 28 जणांना अटक केली. त्यापैकी 3 जणांना जामीन मंजूर करण्यात आला तर 25 जण न्यायालयीन कोठडीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news