Rohan Khawante | एआय-प्रशिक्षित पदवीधरांसाठी 250 कोटी

Rohan Khawante | पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती : 2030 पर्यंत 50 हजार युवक तयार करणार
पर्यटन मंत्री रोहन खंवटे
Rohan khawante
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

२०३० पर्यंत सुमारे ५०००० एआय-प्रशिक्षित पदवीधर तयार करण्याचे गोव्याचे धोरण आहे. यासाठी नव्याने मंजूर झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरणांतर्गत, अंदाजे २५० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद आहे, अशी माहिती माहिती वं तत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

पर्वरी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना खंवटे म्हणाले की, एआय धोरण उद्योगांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या भूमिकेसाठी राज्याला प्रोत्साहित करेल आणि गोव्याच्या तरुणांना तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्यासाठी सुसज्ज करेल. एआय हा तंत्रज्ञान ४.० चा भाग आहे आणि ते भविष्य आहे. आम्ही धोरण, पायाभूत सुविधा, परिसंस्था आणि आराखडा तयार केला आहे जेणेकरून गोव्याच्या तरुणांना त्याचा फायदा होईल.

आम्हाला २०३० पर्यंत सुमारे ५०००० एआय प्रशिक्षित पदवीधरांची गरज आहे. प्रस्तावित २५० कोटी रुपयांच्या खर्चापैकी, ५० कोटी रुपये कौशल्य विकासासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. नवोपक्रम निधी उद्योजकता, नवोपक्रम आणि संशोधनाला समर्थन दण्यासाठी दहा कोटी रुपये तरतूद आहे.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे
Panaji shopkeepers fire safety demand|पणजी मार्केटमधील १०९ दुकानांना आगीचा धोका

असे त्यांनी सांगितले. मंत्री खंवटे म्हणाले की, प्रस्तावित उपक्रमांपैकी एक म्हणजे भाषा तंत्रज्ञान मजबूत करण्यासाठी आणि एआयच्या स्थानिक भाषांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी, स्टार्टअप आणि पायाभूत सुविधा घटकांमध्ये नवनवीन शोध आणि तंत्रज्ञान विकासाला समर्थन देण्यासाठी संगणकीय सँडबोन, डेटा एक्सचेंज आणि आयटी हब यांचा समावेश असेल. पायाभूत सुविधांसाठी चार ठिकाणांचा विचार करत आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत पुढील नियोजन अपेक्षित आहे, असेही पर्यटनमंत्री खंवटे म्हणाले.

नोकरी निर्माण करणारे युवा तयार व्हावेत

मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, सरकारला तरुण गोवेकरांना नोकरी शोधण्याऐवजी नोकरी निर्माण करणारे बनण्यास मदत करायची आहे. त्यासाठी त्यांना संबंधित कौशल्ये आणि संधी उपलब्ध करून द्याव्यात. या धोरणाचा उद्देश त्यांना तंत्रज्ञान-आधारित उपाय विकसित करण्यास, स्टार्टअप्स स्थापन करण्यास आणि गोव्यात राहूनच आयटी इकोसिस्टममध्ये सहभागी होण्यास सक्षम करणे हे सरकारचे ध्येय आहे, असे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.