

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मागील अनेक वर्षात जागतिकीकरण आणि त्याचे पैलू यावर चर्चा सुरू आहे. मातृभाषेवरही जागतिकीकरणाचा अनेक अंगाने परिणाम झालेला दिसून येतो. मात्र यामुळे मातृभाषेतील संधी आणि पर्याय वाढले असून सकारात्मक पद्धतीने जागतिकीकरणाचा मातृभाषेचे संवर्धन, प्रसार आणि प्रचारासाठी फायदा करता येऊ शकतो, असे मत २१ व्या जागतिक मराठी संमेलनात मराठीप्रेमी आणि भाषा संवर्धनात आमूलाग्र कार्य केलेल्या दिग्गजांनी व्यक्त केले.
मातृभाषा आणि जागतिकीकरण या चर्चासत्रात चंद्रकांत दळवी, अशोक नायगावकर, परेश प्रभू आणि योगेंद्र पुराणिक यांच्याशी विजय चोरमारे आणि मंगेश काळे यांनी संवाद साधला. यावेळी जपानमध्ये स्थित असलेले योगेंद्र पुराणिक यांनी चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला.
संवाद सत्राची सुरुवात अशोक नायगावकर यांच्या मराठी कवितेने झाली. नोकरीनिमित्त जपानमध्येच स्थायिक झालेले योगेंद्र पुराणिक म्हणाले की, माझी शैक्षणिक पार्श्वभूमी ही मराठीतूनच आहे.
२००१ साली जपानमध्ये आयटी क्षेत्रात कामास सुरुवात केली. तिथे उच्च पदावर काम केल्यानंतर मी तिथल्या बँकेमध्ये चांगल्या पदावर नोकरी केली. जपानमध्ये राहत असताना तिथल्या सामाजिक परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर मी राजकारणातही प्रवेश केला आणि पहिला भारतीय जपानी आमदार म्हणून काम सुरू केले.
मराठी भाषिकांसाठी परदेशात नोकरी आणि शिक्षणाच्या खूप संधी आहेत. मात्र कोणताही शॉर्टकट न घेता मेहनत करून योग्य मागनिच चालले पाहिजे. असल्याने केवळ स्वतःवर विश्वास दाखवून आपण पाहिजे त्या उंचीपर्यंत पोहोचू शकतो. गोव्यातील परेश प्रभू व चंद्रशेखर दळवी यांनी यांनीही या परिसंवादात सहभाग घेत आपली भूमिका मांडल्या.
एकमेकांना साहाय्य करण्याची गरज : नायगावकर
ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर म्हणाले की, सध्या भारत असो की परदेश सर्वत्र संवादाचे माध्यम हे इंग्लिश बंगले आहे. मात्र ज्याप्रमाणे इंग्रजांनी भारतात सर्व ठिकाणी वखारी तयार केल्या त्याचप्रमाणे मराठी माणसानेही परदेशात आपल्या वखारी तयार केल्या आहेत. जिथे तिथे मराठी मंडळे तयार होत असून मराठी भाषेचे सार्वत्रिकरण आणि खऱ्या अर्थाने जागतिकीकरण गतीने चालले आहे. मात्र अद्याप मराठी माणूस अर्थकारणामध्ये मागे असल्याने एकमेकांना सहाय्य करण्याची गरज आहे.