Goa Row | गौतम खट्टरला सहा दिवसांची पोलिस कोठडी

गौतम खट्टरला सहा दिवसांची पोलिस कोठडी पणजी :
Goa Row
गौतम खट्टर याला न्यायालयात नेताना पोलिस.
Published on
Updated on

पणजी : वास्को येथील एका कार्यक्रमात जुने गोवेच्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह शेरेबाजी व भावना दुखवणारी वक्तत्वे केल्याप्रकरणी फरारी असलेल्या गौतम खट्टर याला रविवारी क्राईम ब्रैचच्या पोलिसांनी गोव्यात आणले. सत्य की जीत, सत्यमेव जयते असे काहीसे पुटपुटले. त्यानंतर त्यांना पोलिस कोठडीसाठी नेत असताना सभी को जय श्रीराम असे शब्द उद्‌गारले. अटक झाली तरी त्याचा रुवाब कायम असल्याचे दिसत होते. दरम्यान, गौतम खट्टर याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ६ दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

शुक्रवारी (२४ एप्रिल) संशयित गौतम खट्टर याला अटक केल्यानंतर शनिवारी कुल्लू येथील न्यायायलाकडून तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला, शनिवारी उशिरा हा रिमांड मिळाल्याने गोवा पोलिसांना चंडिगढ येथे येण्यास उशीर झाल्याने विमानतळ गाठणे शक्य झाले नाही. त्यामुळे रविवारी सकाळी गौतम खट्टर याला पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याला गोव्यात आणले.

दुपारी १ वाजता मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला घेऊन उतरल्यावर मीडियाला चकवून त्याला व्हीआयपी लेनमधून बाहेर काढण्यात आले. क्राईम ब्रँच पथकाने संशयित गौतम खट्टर याला रायबंदर येथील क्राईम ब्रँचमध्ये आणल्यानंतर त्याला सोशल मीडियाने त्यांनी केलेल्या वक्तव्याशी ठाम आहे का? असे वक्तव्य करण्यास त्यांच्यावर कोणी दबाव आणला होता का? हे विधान करण्यामागे त्यांचा हेतू काय होता? अशा प्रश्नांचा भडिमार केला. मात्र त्यांनी कोणतेही उत्तर वा स्पष्टीकरण करण्यास नकार दिला.

दरम्यान, त्याचा भाऊ माधव खट्टर याची पोलिस कोठडी उद्या (२७एप्रिल) संपणार आहे. माधव खट्टर याला यापूर्वीच अटक झाली आहे. त्यामुळे ही भडक विधाने करण्यामागे कोणाचा हात आहे हे दोघांची एकत्रित चौकशी करून पोलिस चौकशी करणार आहेत. गौतम खट्टर यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात धार्मिक तेढ व अशांतता निर्माण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांत विविध भागातून तक्रारी दाखल होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news