Goa Row Gautam Khattar brother arrest | खट्टरच्या भावाला हरिद्वारमध्ये अटक

Gautam Khattar brother Madhav Khattar arrest-लूक आऊट नोटीस जारी; भाऊ माधवला केले सहआरोपी
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविरोधात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने संशयित गौतम खट्टर याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना तो सापडला नसला, तरी पोलिसांनी गौतमचा भाऊ माधव खट्टर याला अटक केली.

माधव हाच गौतमच्या वतीने आयोजकांशी बोलणी करत होता आणि त्यानेच गौतमला भाषण लिहन दिले होते. नंतर त्याने ते रेकॉर्ड करून समाज माध्यमांवर पोस्टही केले होते. आयोजकांनी वास्को येथे गुन्हे शाखेलाही माहिती दिल्यावर पोलिसांनी माधव याला सहआरोपी करून अटक केली आहे, तर गौतम याच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी केली आहे. गोवा पोलिस माधव खट्टरला हरिद्वार येथून गोव्याला घेऊन येत असल्याचे गुन्हे शाखेने सांगितले. कार्यक्रमाच्या आयोजकांना बुधवारी गुन्हे शाखेत बोलावण्यात आले होते.

Arrest
Goa Lairai Jatra | हजारो व्रतस्थ धोंडांनी पार केले अग्निदिव्य

माधवने लिहून दिले भाषण रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट

गौतम खट्टरचा भाऊ माधव खट्टर वास्को येथील कार्यक्रमासाठी गौतमसोबत होता. तसेच, गौतम खट्टरने सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या विरोधात केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा व्हिडीओ त्यानेच रेकॉर्ड करून सोशल मीडियावर प्रसारित केला होता. गौतमच्या उपस्थितीसाठी समन्वय आणि लॉजिस्टिक्सच्या व्यवस्थेकरिता ते माधवसोबत बोलत असल्याचे आयोजकांनी सांगितले. विमान तिकीट, निवास आणि ५१ हजार रुपयांच्या मानधनाच्या अटींवर माधवने गौतमच्या उपस्थितीला सहमती दर्शवली होती. या गुन्ह्यात तोही सहभागी असल्यामुळे त्याला या प्रकरणात सहआरोपी बनवण्यात आले आहे, असे समोर आले.

Arrest
Goa Casino |नव्या तरंगत्या कॅसिनोप्रश्नी सरकारची कोंडी

गौतमच्या घरावर रात्रभर पाळत

गौतम खट्टरच्या घरावर रात्रभर पाळत ठेवल्यानंतर, हरिद्वारमध्ये आधीच तळ ठोकून असलेल्या गोवा पोलिसांच्या पथकाला आज, बुधवारी माधव खट्टर सापडला आणि त्याला अटक करण्यात आली व पुढील तपासासाठी त्याला गोव्याला आणले जात आहे. गुन्हे शाखेने मुख्य संशयित गौतम खट्टरविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केली असून ती इमिग्रेशन ब्युरोला पाठवली आहे, जेणेकरून तो देशाबाहेर पळून जाऊ शकणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news