Ganesh Festival: गोव्यातील गणपती; ’हौसा’ म्हणजे काय व कधी करतात?

Goa Ganpati Celebration: कोकण प्रांतात व प्रामुख्याने गोव्यामध्ये काही ज्ञातींमध्ये ’हौसा’ हा विधी करण्याची पद्धत आहे.
Gauri Ganpati
Gauri GanpatiPudhari
Published on
Updated on

What is Hausa in Goa Gauri Ganpati Celebration

चिंतामणी रा. केळकर

गणेशोत्सवांतर्गत अनेक अन्य धार्मिक विधी केले जातात. कोकण प्रांतात व प्रामुख्याने गोव्यामध्ये काही ज्ञातींमध्ये ’हौसा’ हा विधी करण्याची पद्धत आहे. सर्व समाजात ही पद्धत किंवा हा विधी नसतो. काही घराण्यांतच हा विधी गणेशोत्सवातील ज्येष्ठागौरी व्रतातील गौरीपूजनादिवशी करतात. इतरांकडे (क्वचितच नागपंचमीला) गणेशोत्सवाच्या दिवशी करतात.

’हौसा’ हा विधी पूर्णपणे लौकिक, रुढीचा प्रकार असल्याने त्यामध्ये एकवाक्यता असण्याचा संभव कमीच व वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धतही असू शकेल. Ganesh Chaturthi

Gauri Ganpati
Ganesh Puja: गणपती पूजेसाठी लागणारे साहित्य आणि त्याचे महत्त्व माहितीये का?

’हौसा’ कोण व कधी करतात?

हा विधी नववधू-वरांनी म्हणजे नवदांपत्याने करायचा असतो. विवाहानंतर प्रथमवर्षीच हा विधी करतात. गणेश चतुर्थी अथवा वेगवेगळ्या सणांच्या वेळीही हौसा करण्याची पद्धत आहे. स्त्री गरोदर असता पांच मास पूर्ण होईपर्यंत करतात. प्रथमापत्य जन्मापूर्वी करण्याची पद्धत व गणेशचतुर्थीच्या दिवशीच करण्याची पद्धत विशेषत्वाने दिसते. तर काही ठिकाणी प्रथम वर्षी हा विधी संकटवश राहिल्यास व प्रथमापत्य झाल्यास, अपत्याला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी करण्याची पद्धत दिसून येते.

काही ठिकाणी गणेशोत्सवात सूर्याचे उत्तरा हे महानक्षत्र असता हौसा करत नाहीत. पण याबद्दलचा समज काही ठरावीक कुळातच आहे.

’हौसा’ कसा करतात किंवा करावा?

यामध्ये पांच सुपल्या (बांबूच्या वेतापासून तयार केलेल्या परड्या किंवा प्रामुख्याने सूप, सुपल्या) असतात. त्यापैकी चार लहान व एक मोठी असते. या सर्वांमध्ये 1 नारळ, करंज्या, लाडू, पानांचा विडा, फळे, थोडे तांदूळ असतात. यापैकी गोव्याच्या परंपरेनुसार प्रथमवर्षी विवाहित वधूला माहेरहून भेट येते. याला ओजे /ओझे (वजें) असे म्हणतात. त्यातील वस्तूंचा आवर्जून यात समावेश असतो.

Gauri Ganpati
One village, one Ganpati : जिल्ह्यातल्या ५३१ गावांत 'एक गाव एक गणपती'

पतीपत्नी यांनी पाटावर समोरासमोर उभे राहून त्यांचेमध्ये अंतरपाट धरतात व प्रथम मोठे सूप व नंतर इतर चारही सुपल्या पत्नीने अंतरपाटाखालून नवर्‍याकडे देणे व नवर्‍याने वरून परत पत्नीकडे देऊन त्या बाजूला ठेवणे, अशा पांचही सुपल्यांचे हस्तांतरण झाल्यावर अंतरपाट काढतात. नवदांपत्य घरातील सर्व वडीलधार्‍यांना नमस्कार करुन गणपतीच्या समोर पतीच्या उजव्या बाजूला पत्नी पूजेसाठी बसते. घरातील सुवासिनी दोघांना हळद-कुंकू, अक्षता लावते व ओटी भरते. त्यानंतर गणपती पूजन केले जाते.

पुरोहिताच्या मार्गदर्शनानुसार सर्व सुपल्यांवर हळद, कुंकू, फूल, अक्षता, तुळशीपत्र वाहिले जाते. उत्सवातील पार्थिव गणपती व गौरीमहादेव यांची उमामहेश्वरासहित गणपतये नमः पूजा केली जाते.

आचमन करून पत्नी पदराला लावून एक सुपली गणपतीकडे ठेवते. एक कुलदेवतेला, एक माहेरच्या कुलदेवतेला, ग्रामदेवतेला व एक ब्राह्मणाला देते. (नंतर त्यातील तीन ज्येष्ठ सुवासिनींना देते). मोठी सुपली घेऊन दाम्पत्याने आजुबाजूच्या 4-5 घरात जाऊन त्या त्या घरातील सुवासिनींना हळद-कुंकू लावण्याची पद्धत आहे. सुपलीतील खाद्य पदार्थ त्यांना देण्याची पद्धत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news