नोकरीचे आमिष दाखवून चार लाखांची फसवणूक

पोलिसांत तक्रार; एकास अटक, दुसर्‍याचा शोध सुरू
Fraud of four lakhs by pretending to be a job
नोकरीचे आमिष दाखवून चार लाखांची फसवणूकPudhari File Photo
Published on
Updated on

वास्को : शिक्षण खात्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून 4 लाख 30 हजार रुपयांची दोघांनी फसवणूक केल्याप्रकरणी नवेवाडे येथील साक्षी सुदर्शन केरकर यांनी वास्को पोलिसांत तक्रार केली आहे. या प्रकरणी संशयित गोविंद मांजरेकर (42, बायणा) पोलिसांनी रविवारी अटक केली आहे, तर दुसरा संशयित सूरज नाईक याचा पोलिस शोध घेत आहेत. या दोघांनी आणखी किती जणांकडून नोकरीसाठी रक्कम घेतली होती. याचा तपास केला जात आहे.

साक्षी केरकर यांच्या तक्रारीमुळे इतरही पैसे दिलेले लोक पुढे येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. साक्षी केरकर यांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे की, संशयित गोविंद मांजरेकर व सूरज नाईक यांनी शिक्षण खात्यात नोकरी देण्याचे आश्वासन आपल्याला दिले होते. त्यासाठी त्यांनी 1 मार्च 2023 ते 31 मे 2023 या दरम्यान, 4 लाख 30 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर त्यांनी नोकरी देण्याऐवजी टाळाटाळ सुरू केली. नोकरी नाही देत तर निदान आपली रक्कम तरी परत द्या, अशी विनंती साक्षी यांनी त्यांना केली होती. मात्र याकडेही त्या दोघांनी दुर्लक्ष केले.

राज्यात नोकरी विक्री घोटाळा प्रकरणे उघडकीस येत असल्यामुळे धीर आलेल्या साक्षीने शनिवारी (दि.9) वास्को पोलिस ठाण्यात मांजरेकर व नाईक यांच्याविरोधात तक्रार केली. वास्को पोलिसांनी त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मांजरेकर याला रविवारी अटक करण्यात आली. या प्रकरणी वास्कोचे उपअधीक्षक गुरुदास कदम व निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कॅरी फर्नांडिस पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news