Goa Panchayat Directorate | अपात्रतेविरोधात माजी सरपंच रोशन रेडकरची खंडपीठात धाव

Goa Panchayat Directorate | पंचायत संचालनालयाकडून सूचना घेण्याचे निर्देश
Nanded News
Nanded News : नांदेडमधील एकत्रित निविदा प्रक्रियेला हायकोर्टात आव्हानFile Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

बर्च अग्निकांडप्रकरणी हडफडे-नागोवा ग्रामपंचायतीचे अपात्र ठरलेले सरपंच रोशन रेडकर यांनी पंचायत संचालनालयाने दिलेल्या अपात्रतेच्या आदेशाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ५ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असून, न्यायालयाने सरकारच्या वकीलांना पंचायत संचालनालयाकडून सूचना घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Nanded News
Nashik Rain Yellow Alert Update | "संततधार सुरूच; उद्या नाशिक जिल्ह्यासाठी पुन्हा 'यलो अलर्ट' जारी"

रेडकर यांनी आपल्या याचिकेत दावा केला आहे की, पंचायत संचालनालयाने आपली बाजू मांडण्याची संधी न देता त्यांना सध्याच्या कार्यकाळासह पुढील पाच वर्षांसाठी अपात्र ठरविले. बाजू मांडण्याची संधीही दिली गेली नव्हती. ही चूक खुद्द पंचायत संचालनालयाने मान्य केली असल्याचेही वकिलांनी खंडपीठासमोर स्पष्ट केले. त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे आणि आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

Nanded News
Ozar Flyover Repair | "ओझरला उड्डाणपूल दुरुस्ती, सात दिवस नाशिक लेन बंद! धोकादायक भगदाडामुळे एकेरी वाहतूक व्यवस्था"

तसेच, प्रकरणाचा फेरविचार करण्यासाठी ते पुन्हा पंचायत संचालनालयाकडे पाठवण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीच्या प्रकरणानंतर रोशन रेडकर यांच्यावर विविध आरोप झाले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news