मडगावमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग, अग्निशमन दलाने इमारतीतील २७० जणांना वाचवले

८० खोल्यांचे मोठे नुकसान
Goa news
शॉर्टसर्किटमुळे मडगावमध्ये लागलेली आगPudhari photo
Published on
Updated on

मडगाव, पुढारी वृत्तसेवा : खारेबांध, मडगाव येथे बुधवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका इमारतीतील सुमारे ८० खोल्यांचे मोठे नुकसान झाले. सुमारे २७० रहिवासी अडकले असतानाही, मडगाव अग्निशमन दलाने वेळेवर दाखल होत जीवावर उदार होऊन बचावकार्य करत सर्वांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेत दोन अग्निशमन कर्मचारी जखमी झाले आहेत.

‘दाऊद’ नावाची ही रहिवासी इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दुर्घटनेच्या वेळी इमारतीत महिलांसह लहान मुले आणि वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगीच्या वेळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला. संपूर्ण इमारत धुराने भरल्यामुळे अनेकांचा श्वास कोंडू लागला. स्थानिकांच्या मदतीने १०० पुरुषांना बाहेर काढण्यात आले, तर अग्निशमन दलाच्या जवानांनी १६७ महिला आणि मुले सुरक्षितपणे बाहेर काढले. दरम्यान, खबरदारी म्हणून खोल्यांतील २५ घरगुती गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात आले. आगीत अनेकांचे साहित्य आणि दागदागिने जळून खाक झाले.

जखमी अग्निशामक कर्मचारी

या बचावकार्यात मडगाव अग्निशामक दलाचे अधिकारी गिल सोजा आणि एक जवान धुरामुळे बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांच्या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

निवारा केंद्राची व्यवस्था

आगीत बेघर झालेल्या नागरिकांसाठी दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने निवारा केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. काही लोकांनी आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतर केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news