FDA Food Safety Action | एफडीएतर्फे ३५ विशेष मोहिमेंतर्गत ३२५ हून अधिक आस्थापनांची तपासणी

२,३०० किलोहून अधिक अन्न उत्पादने नष्ट : २९.०९ लाख रुपयांचा दंड
FDA Food Safety Action | एफडीएतर्फे ३५ विशेष मोहिमेंतर्गत ३२५ हून अधिक आस्थापनांची तपासणी
Published on
Updated on

पणजी : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गोव्यात अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई तीव्र केली आहे. आता रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत अचानक तपासणी केली जात आहे. गेल्या चार महिन्यांत एफडीएतर्फे ३५ विशेष मोहिमेंतर्गत ३२५ हून अधिक आस्थापनांची तपासणी केली. या कारवाईअंतर्गत २,३०० किलोहून अधिक अन्न उत्पादने नष्ट करण्यात आली असून, २९.०९ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर ही अंमलबजावणी अधिक तीव्र करण्यात आली आहे. कारण या काळात मिठाई, स्नॅक्स, दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी सामान्यतः वाढते. ज्यामुळे अन्न व्यवसायांची एक मोठी श्रेणी एफडीएच्या देखरेखेखाली येते. लहान गाडे, रस्त्यावरील खानावळी, उत्पादन युनिट्स, केटरर्स, सुपर मार्केट्स आणि इतर खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये स्वच्छता, साठवणूक, हाताळणी आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि संबंधित नियमांमधील तरतुदींचे पालन तपासणारी पथके तैनात करण्यात आली.

या अंमलबजावणीमुळे आतापर्यंत २,३०० किलोहून अधिक नियमांचे पालन न करणारे खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये बिस्किटे, मिठाई, काजू, पनीर, टोफू, फरसाण, मावा आणि चिकन यांचा समावेश आहे. तपासणी आता केवळ पारंपरिक रेस्टॉरंटपुरती मर्यादित राहिलेली नाही, एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. एका हॉटेल चालकांने सांगितले की, पावसाळ्यात सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हे एक चांगले पाऊल आहे. विशेषतः जेव्हा बरेच लोक वापरलेले स्वयंपाकाचे तेल वापरतात. अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी योग्य नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे आणि अधिकारी कडक तपासणी करत आहेत ही चांगली गोष्ट आहे. अन्न व्यवसायात काही परवाना नसलेले व्यावसायिकदेखील आहेत जे विहित नियमावलीचे उल्लंघन करतात. त्यामुळे नियमित तपासणी आवश्यक आहे.

एप्रिल २०२५ पासून आजपर्यंत विविध अन्न सुरक्षा उल्लंघनांसाठी दंड आकारण्यात आला आहे. तसेच, २०२५-२६ आणि त्यानंतरच्या कालावधीतील निकृष्ट दर्जाच्या अन्नाशी संबंधित प्रकरणांमध्ये आम्ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसमोर ३६ न्यायनिर्णित खटले दाखल केले आहेत. यापैकी १८ प्रकरणांवर निर्णय देण्यात आला असून, दोषींवर एकूण १०.४५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

FDA Food Safety Action | एफडीएतर्फे ३५ विशेष मोहिमेंतर्गत ३२५ हून अधिक आस्थापनांची तपासणी
RGP Dispute Resurfaces-आरजीपीतील वाद पुन्हा उफाळला

विशेष अंमलबजावणी मोहिमा राबवल्या

एफडीएच्या संचालक आणि सुरक्षा आयुक्त श्वेता देसाई यांच्या म्हणण्यानुसार, खात्याने यावर्षी एप्रिलपासून राज्यभरात ३५ हून अधिक विशेष अंमलबजावणी मोहिमा राबवल्या असून, त्याअंतर्गत ३२५ हून अधिक अस्थापनांची तपसणी केली आहे.

आत्मविश्वास निर्माण होण्यासही मदत

लहान व मध्यम हॉटेल संघटना अध्यक्ष संतोष दिवकर म्हणाले की, दुग्धजन्य पदार्थांवर, विशेषतः पनीरवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण त्याचा मोठा साठा महाराष्ट्र आणि कर्नाटकातून गोव्यात येतो. अनेक रेस्टॉरंटस् अॅनालॉग पनीर वापरत आहेत. जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. या धाडींमुळे लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासही मदत होते. पर्यटक गोव्याला येतात आणि जेवणासाठी जास्त पैसे मोजतात. त्यामुळे जर दिले जाणारे अन्न भेसळयुक्त किंवा असुरक्षित असेल, तर त्याचा परिणाम एक पर्यटन स्थळ म्हणून गोव्याच्या प्रतिमेवर होतो.

FDA Food Safety Action | एफडीएतर्फे ३५ विशेष मोहिमेंतर्गत ३२५ हून अधिक आस्थापनांची तपासणी
IFFI : इफ्फीत तरुण, नवोदित दिग्दर्शकांना संधी देण्यावर भर
logo
Pudhari News
pudhari.news