Porvorim Flyover | पर्वरी उड्डाणपुलावरील दिशादर्शक फलक चुकीचे! रात्रीच्या वेळी अपघाताची भीती; दिलीप नाईक यांचा दावा

Porvorim Flyover | स्वयं सुरक्षा फोरमचे दिलीप नाईक यांनी वेधले लक्ष
Porvorim Flyover Traffic Issue
Porvorim Flyover Traffic Issue
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

अटल सेतूच्या पर्वरीकडील एक्झिटजवळ बसविण्यात आलेले दिशादर्शक फलक चुकीचे असून, वाहन चालकांमध्ये त्यामुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो, असा दावा गोवा रस्ता सुरक्षा मंचाचे निमंत्रक दिलीप नाईक यांनी केला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अशा फलकांमुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता नाईक यांनी व्यक्त केली.

Porvorim Flyover Traffic Issue
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

पर्वरीतील वाहतूक व्यवस्थ्याची पाहणी केल्यानंतर नाईक यांनी वाहनचालकांना एक्झिट, मार्गिका आणि पुढील मार्गाची माहिती पुरेशा अंतरावरून स्पष्टपणे मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रशासनाने दर्जादार आणि रेड्रो-रिफलेक्टिव्ह दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी त्यांनी केली.

कमी दर्जाचे किंवा चुकीच्या ठिकाणी लावलेले फलक वाहनचालकांना अचानक मार्गिका बदलण्यास अथवा ब्रेक लावण्यास भाग पाडू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पर्वरीतील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर सरकारने रम्बलर स्ट्रिप्स, कॅमेरे आणि वेगमर्यादेचे ठळक फलक बसविण्याची मागणी केली.

Porvorim Flyover Traffic Issue
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

काही फलक सुमारे ३०० मीटर आधी बसविण्याची योजना असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले होते. मोठ्या रस्ते प्रकल्पांच्या खर्चातील १० टक्के रक्कम दिशादर्शक फलक आणि रस्ता सुरक्षा उपायांसाठी राखून ठेवावी, अशी मागणी नाईक यांनी केली. तसेच रस्ता सुरक्षेसाठी प्रशिक्षित सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्यांच्या अनुभवाचा अधिक प्रभावी वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news