Vijay Sardesai | फातोर्ड्यात राजकीय वातावरण तापले

Vijay Sardesai | दामू नाईक-विजय सरदेसाई यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
Goa legislative assembly bill 2026
MLA Vijay Sardesaipudhari photo
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

विधानसभा निवडणुकीला अद्याप काही काळ असला तरी फातोर्डा मतदारसंघातील राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा फातोडाचे माजी आमदार दामू नाईक आणि विद्यमान आमदार विजय सरदेसाई यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला असून, दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या संपादित जमिनी त्यांना परत देण्याच्या मागणीवरून सुरू झालेला वाद आता वैयक्तिक टीकेपर्यंत पोहोचला आहे.

Goa legislative assembly bill 2026
पत्रकारितेतील अळंबी

शेतजमिनीवर उभारलेला बंगला परत करा, असे आव्हान दामू नाईक यांनी दिल्यानंतर विजय सरदेसाई यांनीही जोरदार पलटवार करत बंगला कसा परत करता येईल, असा प्रश्न उपस्थित करताना दामू नाईक यांचे डोके ठिकाणावर नसून त्यांना उपचारांची गरज आहे, अशी बोचरी टीका केली आहे. फातोडातील शेतकऱ्यांच्या कृषी जमिनी ट्रक टर्मिनल प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या होत्या.

मात्र, स्थानिकांच्या आंदोलनानंतर हा प्रकल्प रद्द करण्यात आला. त्यामुळे या जमिनींचा कोणताही उपयोग होत नसल्याने त्या पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्याव्यात, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीवर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी विजय सरदेसाई यांच्यावर टीका केली. बोचरी टीका केली आहे.

फातोडातील शेतकऱ्यांच्या कृषी जमिनी ट्रक टर्मिनल प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र, स्थानिकांच्या आंदोलनानंतर हा प्रकल्प रद्द करण्यात आला. त्यामुळे या जमिनींचा कोणताही उपयोग होत नसल्याने त्या पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्याव्यात, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

या मागणीवर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी विजय सरदेसाई यांच्यावर टीका केली. केली होती. ट्रक टर्मिनल प्रकल्प रोखण्यासाठी आपणच जनआंदोलन उभारले होते, असा दावा करत सरदेसाई यांनी या विषयावर आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली. राजकीय विरोधासाठी कोणत्याही पातळीवर जाऊन टीका करणे योग्य नसल्याचे सांगताना सरदेसाई यांनी दामू नाईक यांच्या वक्तव्यावर उपरोधिक भाष्य केले. जून महिना अर्धा संपला तरी पाऊस पडलेला नाही.

Goa legislative assembly bill 2026
Goa Tourism sector - गोवा पर्यटन क्षेत्र धोक्यात

रखरखत्या उन्हाचा परिणाम त्यांच्या डोक्यावर झाला असावा. त्यामुळेच ते अशी विधाने करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. ट्रक टर्मिनलचा मुद्दा पुन्हा उपस्थित करताना सरदेसाई म्हणाले की, फातोड्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर ट्रक टर्मिनल उभारण्याचा सरकारचा प्रयत्न जनआंदोलनाच्या बळावर हाणून पाडण्यात आला. त्या जमिनी आजही विनावापर पडून असल्याने त्या पुन्हा शेतकऱ्यांना परत देण्यात याव्यात, ही आमची ठाम भूमिका आहे.

सरदेसाईंची राजकीय आक्रमकता वाढली

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून आमदार विजय सरदेसाई यांनी आपली राजकीय आक्रमकता वाढविल्याचे दिसून येत आहे. वाढदिवसानंतर त्यांनी काँग्रेसवर उघडपणे टीका करण्यास सुरुवात केली असून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मायकल लोबो, डिलायला लोबो तसेच केदार नाईक यांनाही लक्ष्य केले आहे. दुसरीकडे भाजपावरही ते सातत्याने हल्लाबोल करत असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news