Goa Crime : चार मुलांच्या बापाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी पळवली; संशयिताला अटक

मुंबईतून आणले गोव्यात; मुलगी पालकांच्या स्वाधीन
Goa Crime News |
चार मुलांच्या बापाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी पळवलीPudhari File Photo
Published on
Updated on

मडगाव : चार मुलांचा बाप असूनही 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून तिला पळवून गोव्यात आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिस आणि स्थानिक युवकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे सदरच्या इसमाला मुलीसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

चार मुलांचा बाप असलेला हा इसम पत्नीपासून विभक्त झालेला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कुडचडेत एका भाड्याच्या खोलीत हे जोडपे राहत होते. सदरची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी मुंबईच्या कफ परेड पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या मोबाईलचे लोकेशनवरून पत्ता मिळविला. त्यानंतर त्यांनी कुडचडे पोलिसांशी संपर्क साधला व पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक युवकांच्या मदतीने त्याला पकडून त्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. सदर अल्पवयीन मुलीच्या घराची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे तिने इयत्ता अकरावीत असताना शिक्षण सोडले होते.

कफ परेड पोलिस स्थानकाचे उप निरीक्षक अजय रायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित विवाहित असून, तो चार मुलांचा बाप आहे. दोघांचीही कुटुंबे शेजारी राहत असल्याने दोघेही एकमेकांच्या चांगल्या ओळखीची होते. बांधकामावर मजूर म्हणून काम करणार्‍या या संशयिताने आपल्या पत्नीबरोबर घटस्फोट घेतला आहे.

‘प्रेमाच्या नावाखाली पीडित मुलीला भुरळ घालत तिला आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर मुंबईत खोटे लग्न करून तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधत तिला घेऊन तो गोव्यात घेऊन आला. हा प्रकार कळाल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली. त्याच्याविरोधात अल्पवयीन मुलीचे अपहरण, फसवणूक, बलात्कार आणि बालकांच्या हक्कांवर गदा घालणारे गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मुंबई कफ परेड पोलिसांनी त्यांचा मागावर होते. त्यांच्या मोबाईल लोकेशन वरून दोघेही दक्षिण गोव्यातील कुडचडे येथे असल्याचे निदर्शनास आले. कुडचडेत भाड्याच्या खोलीत दोघेही पती-पत्नी बनून राहत होते. मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध घेत संशयिताला अटक केली. याकामी पोलिस कॉन्स्टेबल निखिल नाईक, स्थानिक रिकी होर्नेकर, सहर्ष नाईक आदींनी पोलिसांना मदत केली. त्या इसमाला ताब्यात घेऊन पोलीस मुंबईला रवाना झाले असून पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीनंतर पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिस दलाचे उपनिरीक्षक अजय रायकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news