Goa Pawan Khera | 'गोवा विकणाऱ्या भाजपला हद्दपार करूया!' फोंड्याच्या राखण यात्रेत काँग्रेस नेते पवन खेडा यांचा एल्गार

Goa Pawan Khera | खासदार पवन खेडा : फोंड्यातील राखण यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Pawan Khera
Pawan Khera Pudhari
Published on: 
Updated on: 

फोंडा : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातून भाजपला हद्दपार करण्याची तयारी गोमंतकीयांनी केली असून काँग्रेस पक्षाच्या गोवा राखण यात्रेतून ते प्रतीत होत आहे, म्हणून एकजूट कायम राखूया आणि गोवा विकणाऱ्या भारतीय जनता पक्षाला गोव्यातून हद्दपार करूया, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार पवन खेडा यांनी काँग्रेसच्या गोवा राखण यात्रेत बोलताना केले. दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी बोटाला बँडेज बांधत मतचोरीच्या प्रकाराचा निषेध नोंदवला.

Pawan Khera
Goa Assembly Election 2027 : फोंडा मतदारसंघात आमदारकीसाठी रस्सीखेच

यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, आमदार अॅल्टन डिकॉस्टा, कार्लोस फेरेरा, अंजली निंबाळकर, राजेश वेरेकर, राजन घाटे, सुनील कवठणकर, प्रतिमा कुतिन्हो, अरुण गुडेकर, जॉन परेरा व इतर काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवन खेडा म्हणाले की, परिवर्तनाची लाट गोव्यातून सुरू होणार असून गोमंतकीयांची एकजूट भाजपला हद्दपार करील.
युरी आलेमांव म्हणाले की, गोव्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे.

महागाई वाढली आहे, बेरोजगारी सतावत आहे, अशा परिस्थितीत काँग्रेसच गोवा आणि गोमंतकीयांचे हित जपणार आहे. अल्टन डिकॉस्टा, कार्लोस फेरेरा व इतरांनीही आपले विचार व्यक्त करताना भाजपवर कडाडून टीका केली. सूत्रसंचालन अमरनाथ पणजीकर यांनी केले. फोंडा शहर परिसरात राखण यात्रा फिरून बसस्थानकावर जाहीर सभा घेण्यात आली.

केतन भाटीकर यांचे इस्पितळाला नाव:

फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करताना या इस्पितळाला काँग्रेसचे नेते डॉ. केतन भाटीकर यांचे नाव देण्यात येईल अशी घोषणा विरोधी नेते युरी आलेमांव यांनी केली.

तरुणांना रोजगार देण्यात सरकार अपयशी : पवन खेडा

राज्यातील तरुणांना रोजगार देण्यात भाजप सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे, अशी टीका काँग्रेसचे खासदार तथा मीडिया व कम्युनिकेशन विभागाचे अध्यक्ष पवन खेडा यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. राज्यातील तरुणांना रोजगार, राज्यात सहज उपलब्ध होणारे अमलीपदार्थ आणि वाढती गुन्हेगारी या तीन मुद्द्यांवरून खेडा यांनी गोवा सरकारला चांगलेच धारेवर धरले. यावेळी माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर, गोवा सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, कार्यकारी अध्यक्ष सुनील कवठणकर आदी उपस्थित होते.

रोजगार धोरणावर बोलताना खेडा यांनी २०१२ मधील आश्वासनाची आठवण करून दिली. त्यावेळी बेरोजगारांना भत्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याचे पुढे काय झाले, याचे उत्तर सरकारने जनतेला द्यावे, असे सांगून खेडा यांनी राज्यात युवकांना पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसून, सरकारने तरुणांच्या भवितव्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला.

शांतताप्रिय गोव्यात गुन्हेगारीचा आलेख चढता आहे, असे सांगून खेडा म्हणाले, खून, बलात्कार, अपहरण, मारहाण, घरफोडी आणि चोरीसारख्या घटनांत वाढ होत आहे. शांतताप्रिय राज्यात अशी परिस्थिती का निर्माण झाली, असा प्रश्नही खेडा यांनी उपस्थित केला.

Pawan Khera
Goa BJP Damu Naik | मगोशी युती अन् फोंडा जागेचा पेच! निर्णय वरिष्ठच घेणार; भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे विधान

खेडा म्हणाले की, काँग्रेस गोव्यात महाविरोधी आघाडीसाठी तयार आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, हे गोवा फॉरवर्ड पार्टीचे आवाहन एक चांगला मुद्दा आहे. खेडा म्हणाले की, सरकारच्या पाठिंब्याशिवाय कोणत्याही राज्यात ड्रग्जचा पुरवठा होऊ शकत नाही. गोव्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा गैरवापर वाढत आहे.

खेडा यांनी निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेवर टीका केली. निवडणूक आयोगाने दावा केल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने फॉर्म ६ ला मंजुरी दिलेली नाही, असे सांगून खेडा यांनी भाजपवर 'मतचोरी'चा आरोप केला. खेडा यांनी गोवा मंत्रिमंडळातील महिलांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले व काँग्रेसने महिलांना अधिक राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, असेही खेडा म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news