

चावडी : पुढारी वृत्तसेवा
महिला दूध पेढे, लोणचे, विविध प्रकारचे गोड पदार्थ बनवून बाजारात त्याची विक्री करतात. अशा पदार्थांना गोव्यातच नव्हे तर विदेशात सुद्धा मोठी मागणी असते. हे पदार्थ कुणालाही सहज मिळण्याच्या दृष्टीने प्रत्येक पंचायत क्षेत्रात महिलांसाठी उत्पादन केंद्र उभारणार आहे, असे प्रतिपादन कोणकोणचे आमदार तथा आदिवासी कल्याण मंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी केले.
ते गोवा सरकारच्या ग्रामीण उपजीविका अभियानार्फे काणकोण रवींद्र भवन येथे सेवा संकल्प अभियानाच्या महिला मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितिता मार्गदर्शन करीत होते.
यावेळी व्यासपीठावर ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक दिपाली नाईक, डी. आर. डी. एच्या, दक्षिण गोवा संचालक संगीता नाईक, सरपंच सेजल गावकर, अक्षता वेलीप, सुप्रिया पागी, पूनम गावकर, निशा च्यारी, विनय तुबकी, महेश नाईक, डॉ. संगम पाटील, डॉ. स्नेहा चोडणकर,
वजन माप खात्याचे निरीक्षक एजेन रॉड्रिग्ज, बँक व्यवस्थापक मयूर देशमूक, मकरंद नवले, सुशांत यसनसुर, प्रशांत नाईक, प्रेमानंद पेडणेकर व हेमंत सोमुक्कल उपस्थित होते.
यावेळी बँक अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या वतीने बँका महिलांसाठी कशाप्रकारे सेवा देऊ शकतात त्यासंबंधी माहिती दिली.
गोव्यातील महिला विविध उत्पादने तयार करण्यास निपुण असून, गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियानार्फे महिलांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने आर्थिक साहाय्य देण्यात येते. ते साहाय्य घेऊन महिला आपल्या पायावर उभ्या राहू लागल्या आहेत.
ज्या महिला आपल्या उत्पादनातर्फे ५ लाखापर्यंत उत्पन्न घेतील त्या महिलांना १ लाख रुपये देणगी देण्याचेही यावेळी डॉ. तवडकर यांनी जाहीर केले. यावेळी गीता नाईक, रसिका नाईक, मनिषा कामत,
सुहासिनी लोलयेकर, सुवर्णा वेळीप, सेजल गावकर या लखपती दिदींनी आपल्यास व्यावसायिक सरकारी योजनेचा लाभ मिळाल्या kako फायदा झाला व आपण सक्षम कसे बनल्या त्याची माहिती दिली. तुळशी वृंदानाला पाणी घालून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागत व प्रस्ताविक दिपाली नाईक यांनी केले तर सूत्रसंचालन शिरीष पै यांनी केले.